loha jpg.jpg 
मराठवाडा

घोडीच्या डोळ्यातून काढला जंत, डॉक्टर म्हणतात...

बा. पु. गायखर

लोहा, (जि.नांदेड) : अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले.

सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले. 

यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. विजय चव्हाण यांनी घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅ. पुरी यांना पाचारण केले.

पशुपालकांनी जनावरांची देखभाल करताना आवश्यक ती काळजी घेतली नाही तर आजारी जनावर दगाऊ शकते. साचलेल्या डबक्यातील दूषित पाणी अथवा गढूळ पाणी प्यायल्याने पोटातून रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांच्या काॅर्निया दृष्टीपटलात सहजगत्या वावरत असतात.

बुबूळ पांढरे पडू लागते. योग्य वेळी उपचार केले नाही तर डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. पोटातील अन्न फोन होत नाही. रक्तक्षय होऊ शकतो. नियमित तपासणी करून जंतनाशक औषधी दिल्या पाहिजेत. घोडीच्या उजव्या डोळ्यात पाणी येत असताना  बारकाईने पाहिल्यावर जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आले.

अर्धापूर तालुका लघू पशू सर्वचिकित्सालय येथे बारा तास उपाशी ठेवून डाॅ. पुरी यांनी भूल देऊन यशस्वी शस्त्रक्रिया करत सूतकृमी बाहेर काढले. सोबत पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी  यांच्यासोबत सहायक गोविंद राऊत होते. शस्त्रक्रियानंतर घोडीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तिची आठ  दिवस विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. 

देशी गायी, बैल, घोडे रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. जनावर रस्त्याने जात असताना साचलेल्या डबक्यातील पाणी मुळीच पाजू नये. गढूळ पाणी लागले तर धोक्याची घंटा आहे. ही सवय मोडीत काढावी. जनावर सतत डोळ्यातून अश्रू गाळत असेल तर जंत संसर्ग होतो. स्वैर वावर टाळणे आवश्यक आहे. 
- डॉ. आर. एम. पुरी, पशुचिकित्सक, लोहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT