mutkule 
मराठवाडा

आमदार मुटकुळे यांच्या पाठीशी शिक्षकांची प्रेरणा, कशी ते वाचा...

राजेश दारव्हेकर

हिंगोली : राष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असून आई वडिलानंतर शिक्षकच माझे गुरु होते. आजचे शिक्षण गोडीगुलाबीचे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण आहे. आता तर त्याही पुढे जात ऑनलाइन शिक्षण झाले आहे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे. गुरुजींचे सर झाले आहेत. सर्व गुरुजींमुळे मी घडलो असल्याचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले. 

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आई-वडिलानंतर माझे गुरु शिक्षकच आहेत. त्यांनी मला घडविले आहे. आई वडीलांप्रमाणे प्रेम देत त्यांनी माझ्यावर संस्कार केले आहेत. त्यांनी शिकविलेल्या अभ्यासाची शिदोरी घेऊन तिचा आयुष्यात उपयोग करीत आहे. माझ्या बालपणी ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ असे शिक्षण होते. यामुळे या उपक्रमाने पाठांतर अधिक होत होते. त्याचा उपयोग परीक्षेत चांगला होत असे. माझे गुरु फणसासारखे होते वागण्यास कठोर पण प्रेमदेखील करत असत. कौतुकाची थाप अनेक पाठीवर पडत असे. त्यांची प्रेरणा सैदव माझ्या पाठीशी आजही कायम आहे. 

आजचे शिक्षण गोडीगुलाबीचे 
पुर्वीच्या शिक्षण पध्दतीत व आजच्या पध्दतीत फार बदल झाला आहे. आजचे शिक्षण गोडीगुलाबीचे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण आहे. आता तर त्याही पुढे जात ऑनलाइन शिक्षण झाले आहे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे. गुरुजींचे सर झाले आहेत. शिक्षकांनादेखील बदलत्या काळानुसार त्यांच्या शिक्षणात देखील बदल झाला आहे. 

शिक्षणामध्ये परिवर्तन होणे गरजेचे
कोरोना संकटामुळे शिक्षणाची वाईट अवस्था झाली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून दुर राहत आहेत. शिक्षणामध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. शिक्षकांचे मोलाचे कार्य पिढी घडविण्याचे आहे. त्यांच्या कार्याची माहिती शब्दात वर्णन करणे कठीण आहे आई, वडिल याप्रमाणे पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करतात. - तानाजी मुटकुळे, आमदार.  

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT