yogesh kamble Sakal
मराठवाडा

Success Story : कष्टाने झिजलेल्या आईच्या हाताला अराम देण्यासाठी यशाला गवसणी घालतोय औशातला 'श्रावणबाळ'

हलाखीच्या परिस्थितीलाही झुगारून बनला सहायक गटविकास अधिकारी

जलील पठाण.

औसा : पाचवीत असतांना घराचा पोशिंदा असलेला बाप डोळ्यादेखत नियतीने हिसकावून घेतला. वडिलांच्या उपचारासाठी जवळ कांहीच नव्हते यावेळी नातेवाईकांनी केलेली मदत देखील वडिलांना वाचवू शकली नाही.

त्यानंतर आई आणि मोठ्या भावाने कुटुंब निर्वाहसाठी उपसलेले कष्ट हे मनाला वेदना देणारे होते. बालवयातही कुटुंबाची होत असलेली आर्थिक फरफट स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काहीतरी बनायचे आणि आईला अराम द्यायचा ही भावना निर्माण झाली. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची जिद्द जन्माला आली.

दहावीनंतर हॉस्पिटलमध्ये काम करीत स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचू लागला आणि काम करीतच तो सहायक गटविकास अधिकारी बनला. ही कथा आहे औशातील एका जिद्दी आणि कणखर युवकाची योगेश मोहन कांबळे असे या युवकाचे नाव आहे. त्याची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्य गटविकास अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे.

योगेशला एक मोठी बहीण आणि एक भाऊ आहे. तो पाचवीत असतांना २००५ मध्ये बकऱ्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करून घर चालविणाऱ्या वडिलांना एक आजार झाला आणि त्यातच ते गेले.

घरातला कमवता पुरुष गेल्याने घराच्या उदरनिर्वाहची जबाबदारी आईवर आली. वडील हयात असतानाच बहिणीचे लग्न झाले होते. आई आणि थोरला भाऊ मिळेल ते काम करून कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करीत होते.

योगेश हे सर्व पाहत होता. आपल्या शिक्षणाचाही खर्च कुटुंब पेलू शकत नसल्याने त्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणे सुरू केले. रात्रपाळी असली की पेशंट संपल्यावर तो रात्र रात्र अभ्यास करायचा. सोबतचे मित्र आणि त्याचे शिक्षक त्याला मार्गदर्शन करायचे. पदवीनंतर तो पहिल्यांदा टॅक्स असिस्टंट म्हणून पास झाला.

त्या नंतरही त्याने परीक्षा देने सुरूच ठेवले. नंतर पीएसआय झाला मात्र याचा नाद सोडून तो पुन्हा विक्रीकर इन्स्पेक्टर यासाठी सलेक्ट झाला. नोकरी करीत तो अभ्यास करीत राहिला व परीक्षा देत राहिला. पाच दिवसांपूर्वी त्याची सहायक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

आईचे कष्ट हीच माझी प्रेरणा

"लहानपणापासून माझ्यासाठी आईने उपसलेले कष्ट आणि तिची होणारी दमछाक एक अधिकारी होण्यासाठी प्रेरणादायी आहे. आमच्या साठी झिजलेल्या माझ्या आईच्या हाताला आणि शरीराला अराम मिळावा म्हणून मी या नंतरही उच्च पदाच्या परीक्षा देत राहणार आहे. परीक्षेसाठी मी घेतलेली मेहनत माझ्या आईच्या कष्टापुढे कांहीच नाही. आईला सुखी ठेवणे हेच अंतिम ध्येय आहे"

योगेश कांबळे औसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT