मराठवाडा

आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्तीसाठी विद्यापीठ सज्ज 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांचा बिगूल शुक्रवारी (ता. 2) वाजणार आहे. 112 पैकी 80 संघांनी आपली उपस्थिती नोंदवली असून या स्पर्धांसाठी भारतीय खेळ प्राधिकरणचा इनडोअर हॉल सज्ज झाला आहे. 

भारतीय खेळ प्राधिकरणच्या परिसरात होणाऱ्या आंतरविद्यापीठ महिलांच्या कुस्ती स्पर्धा या 2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात होणार आहेत. एकुण 112 संघांचा सहभाग यात राहणार असुन त्यापैकी 80 संघांतील सुमारे पाचशे खेळाडू औरंगाबादेत डेरेदाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. 2) सकाळी वजने झाल्यावर लगेचच दोन तासांत या स्पर्धांना आरंभ होणार असुन औपचारिक उद्धाटन सायंकाळी पाचला विनेश फोगाट आणि साक्षी मलिकच्या हस्ते केले जाणार आहे. या स्पर्धेचा समारोप सोमवारी (ता. 5) सायंकाळी होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे देण्यात आली. 

मराठवाड्यासाठी संघ जाहिर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाची घोषणा गुरुवारी (ता. 1) करण्यात आली. या संघाला शबनम शेख आणि डॉ. रामेश्वर विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संघात श्रद्धा कचरे, रुपाली वर्दे, छाया पवार, अश्वीनी मोहिते, कांचन थारवे, भाग्यश्री दुमने, पूजा शेळके, सय्यद अमरीन, प्रिया गुसिंगे, मिनल पठारे यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT