korona virus desease logo.jpg 
मराठवाडा

‘या’ तीनशे आस्थापनांच्या केल्या तपासण्या 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्न आस्थापना दुकानांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयाच्या अखत्यारीतील नांदेड शहर, अर्धापुर व मुदखेड येथील किराणा, प्रोविजन स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, ऑईल शोरुम व जीवनावश्यक वस्तू उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्री दुकाने यांच्या २९८ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पेढीतील कामगारांना, पेढीमालकांना मास्क व सॅनिटायझर्सचा वापर करण्याबाबत सुचित करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार नको
शासनस्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. अन्न व औषध प्रशासन नांदेड या कार्यालयाच्यावतीने सुध्दा विविध उपाय योजना राबविल्या जात असून त्याचाच भाग म्हणुन किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक पुरवठा ग्राहकांना व्हावा याबाबत देखील प्रशासनाकडून सर्व पेढीधारकांना यथायोग्य सुचना देण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी अन्न आस्थापनाधारक यांच्या बैठका घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा काळा बाजार, साठेबाजी, प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करू नये, सामाजीक अंतर राखणे आणि जमावबंदी कलम १४४ चे काटेकोर पालन करावे अन्यथा कठोर कार्यवाहीस सामोर जावे लागेल याबाबत निदर्शीत करण्यात आले आहे. सर्व अन्न आस्थापनाधारकांना देण्यात आलेल्या सुचनांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

डॉ. व्यंकटेश काब्दे आज आकाशवाणीवर
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नांदेड आकाशवाणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती क्लीप जीत आहे. ‘लढा कोरोनाशी’ हा मुलाखती आणि प्रतिक्रियावर आधारीत कार्यक्रम सुरू क्लीप आहे. या अंतर्गत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे यांची कोरोना विषाणूपासून वयोवृध्द व हृदय रोगी रूग्णांनी घ्यावयाची काळजी यी विषयावर मिलींद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत शनिवारी (ता. २५) सकाळी साडेसात वाजता प्रसारीत होणार आहे. श्रोत्यांनी ऐकावी, असे आवाहन नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी नंदादीपक बट्टा यांनी केले आहे.

कोरोना की जंग हम जरूर जीतेंगे 

और कुछ दिन हम घर मे रूकेंगे।
कोरोना की जंग हम जरूर जीतेंगे।।

ना आना, ना जाना कही।
घर से ज्यादा ना है सेफ कही।।
स्वस्थ भारत का इतिहास लिखेंगे,..
कोरोना की जंग हम जरूर जीतेंगे,..

सरकार को चाहिये आपका साथ।
अलग-थलग रहो कुछ दिन कि है बात।।
ध्यान साफ-सफाई का विशेष रखेंगे,..
कोरोना की जंग हम जरूर जीतेंगे,..

देखते ही देखते महामारी बन गयी।
लापरवाही इसकी खूराक बन गयी।।
रफ्तार के इसकी कमर तोडेंगे,..
कोरोना की जंग हम जरूर जीतेंगे,..

-शिवशंकर चिकटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

SCROLL FOR NEXT