file photo 
मराठवाडा

आता लेकीच्या लग्नाला या...! कर्जमुक्त शेतकऱ्याने  मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण

कैलास चव्हाण

परभणी :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रत्यक्ष लाभ सोमवारी (ता.२४) जिल्ह्यातील पिंगळी (ता.परभणी) आणि गिरगाव (ता. सेलू) या दोन गावांतील शेतकऱ्यांना मिळाला आहे. दरम्यान, आता कर्जमुक्ती झाली असून लेकीच्या लग्नाला या साहेब...! असे आग्रहाचे निमंत्रण पिंगळी (ता.परभणी) येथील शेतकरी विठ्ठल गरुड यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिले.  

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. २४) महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी परभणी जिल्ह्यातील पिंगळी व गिरगाव (ब्रु) येथील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदी उपस्थित होते.


अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
पुढे बोलतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची कामे सुरळीतपणे पहिल्याच दिवशी सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून अधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांशी समजूतदारपणे वागून पुर्णत: सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे आयुष्य सहज सोपे (इझी गोईंग) कसे होईल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तरी अधिकाऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्याला न दुखावता आनंदाने व प्रामाणिकपणे योजनेची कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांशी दिलखुलास संवाद 
 या वेळी त्यांनी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील रहिवाशी असलेले शेतकरी विठ्ठल रुस्तुमराव गरुड यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले एक लाख १५ हजार ८७५ रुपये कर्जमाफ झाल्याबद्दल संवाद साधला. शेतकरी विठ्ठल गरुड यांनी कर्जमाफीचा लाभ घेत असताना खूप सहजपणे लाभ मिळाला, कुठलीही किचकट प्रक्रिया पाहावयास मिळाली नाही, तसेच बँक व्यवस्थापक श्री. शिराळे यांनी सहकार्य केल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देऊन शासनाने प्रत्यक्ष कर्जमाफी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रमाणे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. 


शासनाच्या निर्णयाचे स्वागत
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी श्री. गरुड यांच्याशी संवाद साधून कर्जमाफीचा लाभ मिळताना त्रास झाला का, जमीन किती आहे, असे प्रश्न विचारले. पिंगळी येथील बाबाराव शंकरराव दामोदर यांचे एक लाख आठ हजार २७१ रुपयांचे कर्ज माफ झाल्याबद्दल संबंधित शेतकऱ्याने समाधान व्यक्त करून शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT