मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या सरी; दिवसभर ढगाळ वातावरण

सकाऴ वृत्तसेवा

रविवारी देखील सकाळी कोरडी हवा ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच ते तीन यावेळी मेघगर्जनेसह पाऊस झाला.

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. कोरडी हवा (Dry air) सुरू आहे. रविवारी (ता. १६) सकाळी ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. सकाळी व त्यानंतर दुपारी अडीच ते तीन यावेळी मेघगर्जनेसह पाऊस (Rain) झाला. यामुळे हळद काढणीस व्यत्यय आला आहे. (It rained in hingoli district on sunday)

जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. शनिवारी दिवसभर कोरडी हवा होती. रविवारी देखील सकाळी कोरडी हवा ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच ते तीन यावेळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. नंतर ढगाळ वातावरण कायम होते. पावसाच्या अधुनमधून सरी तसेच मेघगर्जना देखील सुरू होती. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदुर झाला आहे. या पावसामुळे सध्या जिल्ह्यात अनेक भागात हळद काढणीची सुरू असलेल्या कामास व्यत्यय आला आहे.

यावर्षी हळद काढणीस वारंवार व्यत्यय येत असल्याने हळद उत्पादक अडचणीत सापडले आहेत. पावसाने या पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना हळद झाकण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांची मशागत पुर्ण होऊन ते खरीप पेरणीसाठी खते, बियाणे घेण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाऊस सुरू झाल्यावर कोरडी हवा थांबली होती. तर पाऊस सुरु असताना देखील उकाडा जाणवत होता. उशीरापर्यंत पावसाची रिमझिम व ढगाळ वातावरण कायम होते. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पाऊस सुरु आहे.

(It rained in hingoli district on sunday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT