मराठवाडा

असे बनले...सालगडी ते भाजीपाला विक्रेता 

जगन्नाथ पुरी

सेनगाव ः तालुक्‍यातील कारेगाव येथील एका अल्‍पभुधारक शेतकऱ्याने जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने सालगडी म्हणून काम करत स्वतःच्या शेतात पाणी उपलब्ध केले. केवळ पंधरा गुंठ्यात भाजीपाल्याची लागवड करून त्‍याच्या विक्रीतून दहा हजार रुपये महिना मिळवत वर्षाकाठी तीन लाखाचे उत्‍पन्न मिळविले आहे. 
सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील सोपान घोंगडे यांच्या कुटुंबाकडे केवळ चार एकर शेती आहे. हलक्या प्रतीची जमीन त्यातही निसर्गावर आधारित शेती उत्पन्न त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट असायचा. बालवयात त्यांनी गावातील जनावरे केवळ भाकरीवर चालण्याचे काम केले. त्यानंतर मोठेपणी इतर शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून शेतात कामे केली. स्वतःकडे कोरडवाहू  शेतीमुळे सोपान यांना दुसऱ्या शेतात वर्षभर काम करावे लागत असे.

खरीपासह रब्बीत घेतली पिके
या शेतकऱ्याने काटकसरीतुन जमलेल्या पैशाने स्वतः शेतात तीन वर्षापूर्वी बोअर घेतला. त्याला पाणी चांगले लागले, संपूर्ण जमीन पाण्याखाली आली आणि सालगडी म्हणून न राहण्याचा निर्णय घेतला. खरीप हंगामात सोयाबीन, तूर, तर रब्बी हंगामात गहू, हरभरा पिके घेण्यास सुरुवात केली. केवळ पंधरा गुंठ्यात भाजीपाला लागवडीचा प्रयोग सुरू केला. त्यामध्ये बैंगन, मिरची, कोथिंबीर, पालक ,भेंडी, गवार, लिंबू, ढेंबस यासह विविध भाजीपाल्याचे उत्पादन सुरू केले. 

महिन्याकाठी दहा हजार रुपये उत्पन्न 
शेतातील भाजीपाला कारेगाव सेनगाव शहरात सकाळीच नेऊन विक्री करण्याचा व्यवसाय दोन वर्षापासून सुरू केला. प्रारंभी डोक्यावर भाजीपाला विक्री केला. ग्राहकांना रोजच सकाळी ताजा भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक आकर्षित झाले. त्यानंतर सायकलीवरून बांधून भाजीपाला विक्री सोपान घोंगडे करत आहेत. बाराही महिने भाजीपाला उत्पादन घेतात शेतातील भाजीपाला दलालांमार्फत न विक्री करता थेट ग्राहकांच्या दारोदारी जाऊन विक्रीतून त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये उत्पन्न होते.

कुटुंबातील सदस्य कामासाठी मदत करतात
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढत आल्यामुळे त्यांना कोणतेही व्यसन जडले नाही. जिद्दीच्या बळावर सालगडी म्हणून जगण्यापेक्षा स्वतःच्या शेतात परिश्रम करून आर्थिक स्थितीवर मात करण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी ठरला. चार एकर शेतात त्यांनी या वर्षी सोयाबीन तीस क्विंटल उत्पादन घेतले तर हरभरा, गहू जवळपास वीस क्विंटल होण्याची शक्यता असल्याचे त्‍यांनी सांगितले. भाजीपाला व इतर पिकांतून वर्षाकाठी जवळपास तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. सकाळी चार ते पाच घंटे भाजीपाला विकुन नंतर पुन्हा शेतात काम ते करतात. त्यांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य कामासाठी मदत करतात.

शिक्षणापासून कोसो दूर रहावे लागले
लहानपणापासूनच काम करण्याची वेळ आली. शिक्षणापासून कोसो दूर रहावे लागले. अनेक वर्ष सालगडी म्हणून काम केले. तीन वर्षांपूर्वी स्वतःच्या शेतात बोअर घेऊन जमीन पाण्याखाली आणली. त्‍यानंतर भाजीपाल्याची लावगड करून दररोज विक्री शहरात जावून त्‍याची विक्री करतो. महिण्याला दहा हजार रुपये महिना मिळत आहेत. -सोपान घोंगडे, शेतकरी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT