iti
iti iti
मराठवाडा

ITI प्रवेशासाठी स्पर्धा, ८ दिवसांत २० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

संदीप लांडगे

औरंगाबाद: आयटीआय प्रवेश प्रक्रियेची नोंदणी १५ जुलैपासन सुरू झाली आहे. यंदा मराठवाड्यातील एकूण १३९ आयटीआय संस्थांमध्ये २० हजार २६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. २३ तारखेपर्यंत मराठवाड्यातील तब्बल वीस हजार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयटीआयची प्रवेशप्रक्रिया १५ जुलैपासून सुरू झाली. इयत्ता दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे.

त्यामुळे आपल्या आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यंदा मराठवाड्यातील ८२ शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार, तर ५७ खासगी आयटीआयमध्ये पाच हजार ६०८ अशा एकूण २० हजार २६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मागील आठवडाभरात २० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयटीआयमध्ये जिल्ह्यातील स्थानिक ९० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून परजिल्ह्यातील दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असणार आहेत.

सीईटीची अट नसल्याने आयटीआयला पसंती
कोरोनामुळे दहावीची परीक्षा न झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेत मराठवाड्यातून सुमारे तीन लाख चांगल्या मार्काने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना सीईटीची अट घातली आहे; पंरतु आयटीआयच्या प्रवेशाला अकरावीप्रमाणे सीईटीसारखी अट नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आयटीआय प्रवेशाला पसंती मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज येतील, अशी शक्यता आयटीआयच्या प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा --------शासकीय संस्था व जागा------ खासगी संस्था व जागा

- औरंगाबाद ---- संस्था ११, जागा २२२४----- संस्था-६, जागा-४३६
- बीड --------- संस्था-१२, जागा २१०८----- संस्था-१४, जागा-१२१६
- हिंगोली------- संस्था-६, जागा ६७२ ------- संस्था-२, जागा २४८
- जालना ------- संस्था-८, जागा १३४४------ संस्था-४, जागा १६४
- लातूर -------- संस्था-११,जागा २४०४----- संस्था-११, जागा १३००
- नांदेड -------- संस्था-१७, जागा २५३२----- संस्था-७, जागा १३२४
- उस्मानाबाद --- संस्था-८, जागा-१७८४------- संस्था-९, जागा ५९२
- परभणी ------ संस्था-९, जागा-१५८८------- संस्था-४, जागा ३२८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT