Jalana news esakal
मराठवाडा

Jalana : ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर थांबवा

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

जालना : दरवर्षी ऊसतोडणी हंगामासाठी पालक आपल्या मुलांसह ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. यामुळे या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. मुले शाळाबाह्य होतात यासाठी संभावित स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शोध घेऊन स्थलांतर थांबवावे, अशा सूचना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सोमवारी ( ता.१०) बैठकीत सूचना दिल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या बालकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ .राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, महिला व बालविकास अधिकारी आर.एन.चिमींद्रे, उप शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, डॉ .भरत वानखेडे, सतीश शिंदे, डी. एस. शहागडकर, अधिव्याख्याता सय्यद अख्तर, शिक्षण विस्तार अधिकारी विनया वडजे, प्रेरणा लोंढे, गट समन्वयक पी.आर.जाधव,सर्व शिक्षा अभियान सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील मावकर यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना वर्षा मीना म्हणाल्या, की ज्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणीसाठी किंवा अन्य कामासाठी स्थलांतरित गावांकडे लक्ष देऊन तेथील मुलांचे स्थलांतर थांबवावे. मोठ्या प्रमाणावर संबंधित पालकांचे समुपदेशन करून त्यांना मुलांच्या शिक्षणाविषयी प्र2बोधन करावे.एका आठवड्यात तालुका, केंद्र व शाळा स्तरावरील समित्यांच्या बैठका घेऊन स्थलांतर रोखावे असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.बैठकीत सर्व शिक्षा अभियान सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील मावकर यांनी सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून चिडला: अम्पायरसोबत वाद

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT