JALKOT NEWS
JALKOT NEWS 
मराठवाडा

नगरपंचायत व गुत्तेदरांच्या हलगर्जीपणाचा कळस; पाण्यासाठी दोन महिन्यांपासून नागरिकांची भटकंती

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): शहरातील मुख्य रस्त्यावर  महामार्गाचे काम चालू आहे. कामामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची एक किलोमीटर पाईपलाईन अडीच महिन्यापासून नादुरुस्त झाल्याने बसस्थानक परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

महामार्गाचे काम करण्यासाठी दिड महिन्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांचे खोद काम केले आहे. एक साईड महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. या खोदकामात दिड महिन्यांपूर्वी मुख्य पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन खोदकाम करताना निकामी झाली आहे. सदर लाईनचे गुत्तेदारांना ईस्टीमेट नगरपंचायतीकडून  देऊन दोन महिने उलटले आहेत. पंरतू अद्याप नवीन पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले नाही.

बसस्थानक परिसरात हजारो नागरिकांचे वास्तव आहे. या भागाला नगरपंचायतकडून दर सहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. पंरतू पाण्याची मुख्य लाईन नादुरूस्त झाल्याने दिड महिन्यांपासून महिला व नागरिकाना पाणी उपलब्ध असूनही भिषण पाणीटंचाईला तोड द्यावे लागत दररोज पाणी विकत घेतल्याशिवाय काहीना पर्याय उरलेला नाही.

नगरपंचायत प्रशासन याबाबत मूग गिळून गप्प बसले आहे. या गुत्तेदारांना उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी एक महिन्यापूर्वी बैठक घेऊन पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम तातडीने करण्याच्या सुचना देऊन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. पंरतू गुत्तेदार व नगरपंचायत प्रशासनाकडून आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

दरम्यान गुत्तेदार व नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागत आहे.चार दिवसात पाईपलाईनचे काम नाही झाल्यास तहसीलदार कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT