police police
मराठवाडा

भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांची बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

कदीम जालना पोलिसांनी लाठीचार्ज करत भाजप युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

जालना: जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिस मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील एका खाजगी रुग्णालायात 9 मे रोजी उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर काही युवकांनी डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचे म्हणत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरवात केला.

पोलिसांच्या मारहाणीनंतरचे व्रण

रुग्णालयात प्रशासनाने याची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी कदीम जालना पोलिसांनी लाठीचार्ज करत भाजप युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे.

या मारहाणीत पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान 'साहेब माफ करा, साहेब माफ करा' अशी याचना भाजपच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायलर झाल्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT