jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : पोळा सणावर दुष्काळाचे सावट अंबड नदी,नाले पाण्यावाचून कोरडेठाक

ओढे,नद्या,नाले,पाझर तलाव पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

बाबासाहेब गोंटे

अंबड - तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. पावसाळ्यात पावसाने म्हणावी तशी जोरदार हजेरी लावली नाही. त्यात पुन्हा काहीशी रिमझिम हजेरी लावून पावसाने पाठ फिरविलेलीच आहे.

यामुळे ओढे,नद्या,नाले,पाझर तलाव पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांचा बैलपोळा सण जवळ आला आहे. त्यातच बुधवारी(ता.१३) सर्जाराजाला आंघोळ घालण्यासाठी, खांदेमळणीला ओढे,नदी,नाले पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे खांदेमळणीसाठीही पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे.

जेथे विहिरीत जलसाठा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पाणी शेंदून सर्जा-राजाला आंघोळ घालावी लागणार आहे. यंदा पोळा सणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारातही सजावटीचे साहित्य, साजाची फारशी खरेदी झालेली नाही. ऐन सणासुदीत बाजारपेठेतही फारशी आर्थिक उलाढाल दिसून येत नाही. दुष्काळी स्थितीचा अर्थकारणावरही परिणाम झालेला आहे.

पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडलेला आहे. पावसाला जोर नसल्याने ठिकठिकाणचे नदीनालेही कोरडे आहेत. यंदा बैलपोळा सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. पोळा सणानिमित्त बाजारातही यंदा फारशी खरेदी करण्यात आलेली नाही.

दगडूजी तिकांडे,शेतकरी, शेवगा

शेतकऱ्यावर कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचे गडद सावट पसरत आहे.रब्बी बरोबर खरीप हंगाम आता हातचा गेल्यातच जमा आहे.नैसर्गिक आपत्ती,रोगराई यामुळे शेतकरी पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे.यामुळे शेतकऱ्यांना बैल पोळा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याची वेळ आली आहे.

संदीप थोरात,शेतकरी, बोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT