Buring Bus News Jalna 
मराठवाडा

औरंगाबाद-जालना रस्त्यावर थरार! धावत्या ट्रॅव्हल्सला लागली अचानक आग, चालक आणि क्लिनरने बसमधून मारल्या उड्या

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : औरंगाबादहून जालन्याला जाणाऱ्या साईरथ ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला शनिवारी (ता.२०) मध्यरात्री १२ वाजता अचानक आग लागली. या बसमध्ये चालक आणि क्लिनर वगळता एकही प्रवाशी नव्हता. मात्र बसला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालक आणि क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवत त्यातून उडी मारली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याने बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना जालना-औरंगाबाद महामार्गावरील वरुडी पाटी (ता. बदनापूर) जवळील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून जालन्याला प्रवाशी घेऊन जाणारी रिकामी साईरथ ट्रॅव्हल्सची बस जालना - औरंगाबाद महामार्गावरील वरुडी शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळ पोचताच बसला अचानक आग लागली. या बसमध्ये चालक - क्लिनर वगळता एकही प्रवाशी नव्हता. बसला आग लागल्याचे चालक संजय बाबासाहेब क्षीरसागर (वय ४२ रा. सिडको एन. ६ औरंगाबाद) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोठ्या शिताफीने बस रस्त्याच्या कडेला थांबवत क्लिनर गणेश विठ्ठल मचे यांच्यासह बसमधून उडी घेतली.

त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, सहायक फौजदार श्री. खंडागळे, पोलिस वाहन चालक शिवाजी भगत यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून पाण्याचे टँकर मागविले. तसेच जालन्याहून अग्निशामक दलाला पाचारण केले. या आगीच्या घटनेत पेटलेल्या ट्रॅव्हल्सच्या  बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT