Samriddhi Highway
Samriddhi Highway sakal
मराठवाडा

Jalna : जिल्ह्यातील औद्योगिक, कृषी विकासासाठी समृद्धीचा महामार्ग तयार

सकाळ वृत्तसेवा

जालना : मुंबई - नागपूरदरम्यानच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण रविवारी (ता.११) होत आहे. जिल्ह्याच्या ४२ किलोमीटर हद्दीतून समृद्धी महामार्ग जात आहे. निधोना येथे इंटरचेंज पॉइंट आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील औद्योगिक, कृषी विकासाला हा महामार्ग पूरक ठरणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण होणार आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग ही प्रवाशांसाठी खुला होणार आहे. जिल्ह्याच्या ४२ किलोमीटर हद्दीतून हा समृद्धी महामार्ग जात आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे २५ गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड,

कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्ण नगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीक पांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत. जिल्ह्याची हद्द ही तालुक्यातील नाव्हा येथून सुरू होऊन बदनापूर तालुक्यातील गेवराईबाजार येथून पुढे औरंगाबाद जिल्ह्याकडे हा महामार्ग जातो.

जालना तालुक्यातील निधोना येथे इंटरचेंज पाँईट आहे. त्यामुळे रविवारपासून (ता.११) या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे जालना येतील स्टील, सिडस्, शेतीमाल निर्यातीसह व्यापारांसाठी या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. या महामार्गावर ताशी १५० किलोमीटरपर्यंत वेगाने वाहतूक होणार आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. शिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांना दळणवळणाच्या दृष्टीने जोडले जाणार आहे. याचा फायदा या दोन्ही भागांना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT