बेमोसमी पावसाने हजेरी लावली
बेमोसमी पावसाने हजेरी लावली sakal
मराठवाडा

jalna : विजांच्या कडकडाटात बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवारी (ता.१४) रात्री वादळवाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गहू, बाजरीसह फळबागांना फटका बसला आहे. दरम्यान, अनेक भागात वीज पुरवठाही विस्कळीत झाला होता.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने जालना जिल्ह्यात येलो अलर्ट दिला होता. त्यानुसार, शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळवारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या अंदाजानुसार शुक्रवारी रात्री वादळवाऱ्यासह जालना शहर, अंबड, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, गोंदी, अंकुशनगर, वडीगोद्री आदी भागात पावसाने हजेरी लावली.

जालन्यात सरी कोसळल्या

जालना शहरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या सरीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुका सुरू होत्या.

जालना शहर साडेनऊ वाजता विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यामुळे काही काळ शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत शहरात हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, या पावसासह वाऱ्यामुळे गारवा पसरला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला.

अंकुशनगरला पडला पाऊस

अंकुशनगर : परिसरात शुक्रवारी दुपारपासून कडक ऊन्ह होते. त्यात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

वारे व पाऊस सुरु होताच वीज पुरवठाही विस्कळीत झाला. या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतशिवारातील काढणीला आलेल्या गहू, बाजरीसह फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेमोसमी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या सततच्या नुकसानीने शेतकरी हतबल झाला आहे.

गोंदीत विजांचा कडकडाट

गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात रात्री नऊ वाजता वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मळणीला आलेला गहू व उन्हाळी बाजरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिसरातील दहा ते बारा गावातील वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने सगळीकडे अंधार पसरला.

कुंभार पिंपळगावात जोरदार पाऊस

कुंभार पिंपळगाव : दिवसभराच्या रखरखत्या उन्हानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आभाळ भरून आले होते.

रात्री साडेआठ वाजता वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दरम्यान, पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत विजेचा कडकडाट आणि पावसाची रिमझिम सुरूच होती.

शहागड परिसरात पिकांची नासाडी

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड परिसरात शुक्रवारी (ता.१४) सायंकाळी वादळवाऱ्यासह बेमोसमी पावसाचा शिडकावा झाला. शहागडसह परिसरातील कुरण,वाळकेश्वर, पाथरवाला बुद्रुक, गोरी, गंधारी ,डोमलगावसह परिसरात सायंकाळी अचानक वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

बेमोसमी पावसामुळे शहागडसह परिसरातील वीट उत्पादक व मजुरांची धांदल उडाली. अनेक शेतकऱ्यांचा शेतातील चारा भिजला. शिवाय उशिरा पेर असलेल्या गहू, ज्वारी आदी पिकांना तसेच द्राक्ष,मोसंबी आदी फळबागांना पावसाचा फटका बसला. बेमोसमी पावसामुळे पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अंबडला धो-धो बरसला पाऊस

अंबड : शहरासह परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजेनंतर वादळ,वारे, ढगांच्या गडगडाटाबरोबर धो-धो पाऊस बरसला. शहराबरोबरच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याने रात्रीच्या गैरसोय झाली. दिवसभराच्या उष्णतेनंतर पावसामुळे रात्री वातावरणात गारवा पसरला होता.

ढगाळ वातावरण

जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळनंतर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यातच कमालीच्या उकाड्यामुळे आबालवृद्ध त्रस्त झाले होते. वादळवाऱ्यासह बेमोसमी पाऊस पडलेल्या अनेक गावात वीज पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे अनेकांना रात्री अंधारात राहावे लागले. ठिकठिकाणी ग्रामस्थांची गैरसोय झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT