संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

जालना जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी मोर्चेबांधणी

भास्कर बलखंडे

जालना -  पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षही सभापती पदांच्या माध्यमातून सत्तेत वाटेकरी होण्यासाठी हालचाली करीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्री. दानवे यांचा होकार मिळाल्यास भाजपला किमान दोन सभापतिपदे मिळू शकतात, असे सूत्रांकडून समजते. 

गेल्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यातून सर्वात जास्त म्हणजे 22 जागा मिळाल्या आहेत. असे असतानाही केवळ भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना या तीन पक्षांनी हातमिळवणी करीत अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद मिळविले. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला या दोन्ही पदांवर पाणी सोडावे लागले. जाफराबाद आणि भोकरदन या दोन तालुक्‍यांतून भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर या प्रवर्गातील सदस्य नसल्यामुळे भाजप बाजूला झाला. शिवाय उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजप नव्हता.

आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून झेडपीला सर्वाधिक निधी मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाला किमान दोन सभापतिपदे देऊन सत्तेत सहभागी करावे, अशी भूमिका काही आघाडीच्या नेत्यांनी मांडली असल्याची चर्चा आहे. यासाठी नळणी जिल्हा परिषद गटातील डॉ. चंद्रकांत साबळे आणि कुंभारझरी सर्कलमधील शालीकराव म्हस्के यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले. याबाबत केंद्रीय मंत्री श्री. दानवे यांच्यासोबत महाआघाडी चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे समजते.

श्री. दानवे यांनी गेल्या पाच वर्षांत जालना जिल्ह्यासाठी सहा हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी खेचून आणला आहे. जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेत सहभागी करून घेतल्यास मोठा निधी येईल, असे काही नेत्यांना वाटते. त्यामुळे मतैक्‍य व्हावे यासाठी हालचाली सुरू असल्याचे कळते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून होकार मिळाल्यास हे सहज शक्‍य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटते. येत्या दोन दिवसांमध्ये यादृष्टीने सकारात्मक पावले उचलली जातील, असे सूत्रांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT