संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

शिस्तीचे तलाठी ते जिल्हा परिषद अध्यक्ष 

गजानन सपकाळ

वरूड बुद्रुक - जालना जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या उत्तमराव सीताराम वानखेडे यांची वाटचाल विलक्षण अशी आहे. कधीकाळचे शिस्तीचे तलाठी, नंतर शेतकरी आणि मग जिल्हा परिषद सदस्य ते आता अध्यक्ष असे या वाटचालीचे स्वरूप राहिलेले आहे. 

मूळ जाफराबाद तालुक्‍यातील सोनखेडा येथील उत्तमराम वानखेडे रहिवासी आहेत. शिस्तीचे तलाठी अशी त्यांची परिसरात ओळख. त्यांना तीन मुले, दोन मुली असे मोठे कुटुंब. तलाठी म्हणून त्यांनी सुरवातीला मंठा, जाफराबाद तालुक्‍यांत सेवा बजावली. नंतर पदोन्नतीने मंडळ अधिकारी झाले. वर्ष 2011 मध्ये गोंदी (ता. अंबड) येथे कार्य केले. तब्बल 33 वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर फेब्रुवारी 2013 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर शेतीकडे लक्ष देण्यास उत्तमराम वानखेडे यांनी सुरवात केली. अर्थात सामाजिक प्रश्‍न, राजकीय जाण असल्याने त्यांना राजकारणाचेही दरवाजे खुले झाले. त्यांच्या सोनखेडा या जिल्हा परिषद गटाच्या पुनर्रचनेनंतर कुंभारझरी गटातून वरूड बुद्रुक गटात सामील झाले. दरम्यान, वरूड बुद्रुक जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यामुळे श्री. वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या गटावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांची मजबूत पकड होती. त्यामुळे शिवसेनेचा मार्ग सुकरच मानला गेला. त्यातच श्री. वानखेडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. या गटात गव्हाड कुटुंबीयांच्या पाठिंब्यासह शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सात हजार 364 मते घेऊन 774 च्या मतधिक्‍याने उत्तमराव वानखेडे हे शिवसेनेकडून जिल्हा परिषदेवर गेले. दुसऱ्या अडीच वर्षांच्या टप्प्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. महाविकास आघाडीच्या जोरावर उत्तमराव वानखेडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या रूपाने प्रथमच वरूड गटास व जाफराबाद तालुक्‍यालाही जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले आहे. 

समाजातील सर्व स्तरांतील जनतेचे प्रश्‍न सोडवून त्यांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा मनोदय आहे. माझी या पदावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवड केली, याचाही आनंद वाटतो. 
- उत्तमराव वानखेडे 
अध्यक्ष, जिल्हा परिषद, जालना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT