jalna
jalna sakal
मराठवाडा

Jalna : तांड्यावरची झेडपी शाळा झाली सुसज्ज

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था झाल्याचे चित्र नेहमीच दिसते. मात्र, अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा ही लोकवर्गणीतून सुसज्ज झाली आहे.

अंबड तालुक्यातील पारनेर केंद्राअंतर्गत असलेली लालवाडी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही इयत्ता चौथीपर्यंत आहे. येथे सध्या २९ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. ही शाळा अंबड शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटरवर आहे. येथील एकही विद्यार्थी इतर शाळांमध्ये जात नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे लोकसहभागातून या शाळेचा कायापालट करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना गणवेश, शाळेला पाण्याची व्यवस्था, खिडक्या, रंगकाम, कंपाऊंड, बाग अशी अनेक कामे करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल होत ही होत आहे. लोकसहभागातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुसज्ज अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित राठोड यांनी प्लायवूड शाळेला भेट दिले. शाळेला माजी अध्यक्ष मदन राठोड, संतोष सोड, नवनाथ चव्हाण, सरपंच डॉ. रमेश चव्हाण, उपसरपंच अंकुश राठोड, माजी सरपंच श्रीराम जाधव यांची शाळेला नेहमीच मदत व सहकार्य मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी खाजगी शाळेप्रमाणे सुविधा आणि शिक्षण मिळत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT