photo 
मराठवाडा

कोंढूरच्या शाळेत आले जपानचे शैक्षणिक साहित्य 

संजय कापसे

कळमनुरी(जि.हिंगोली): तालुक्यातील कोंढूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काईपद्वारे जपानमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साहित्य, चॉकलेट व भेटवस्तू पाठविल्या आहेत. थेट जपानवरून आलेल्या भेटवस्तू पाहून विद्यार्थी आनंदाने हरखून गेले आहेत.

कळमनुरी तालुक्यातील कोंढूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक शंकर लेकुळे, श्रीमती सुगंधे, गिरीधर डोंगळे, सुनील हरण, सोनाली उमक, मनीषा पिंपळगावकर, संजीवनी जांभूळकर शैक्षणिक विषयांची देवाण-घेवाण करण्यासाठी आभासी स्थळ भेट आयोजनाचा उपक्रम एक वर्षापासून राबवित आहेत. यासाठी शाळेत एका स्वतंत्र वर्गात मोठे इंटरएक्टिव्हिटी बोर्ड बसविण्यात आला आहे.

जपानच्या शिक्षक, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

व्हर्च्युअल आभासी स्थळ भेट करण्यासाठी शिक्षक स्काईपद्वारे संपर्क साधण्यासाठी पुढाकार घेतात. यामधून त्यांनी आतापर्यंत विविध देशांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांशी इंग्रजी भाषेमधून संवाद साधला आहे. या उपक्रमांमधून कोंढूर शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांपूर्वी जपानच्या लॅंग्वेज किचन शाळेतील शिक्षक हुरेव व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या संवादामधून आपल्याकडील शैक्षणिक पद्धती त्यांनी जाणून घेतली. 

विविध विषयांवर चर्चा

त्यानंतर तेथील विद्यार्थ्यांकरिता असलेली शिक्षण पद्धत समजावून सांगितली. याशिवाय तेथील बोलीभाषा, शिक्षण पद्धती, नागरिकांचे राहणीमान, खाण्याचे पदार्थ, दोन देशाच्या वेळेमधील फरक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या संवादादरम्यान, तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी कोंढूर शाळेचा संपूर्ण पत्ता विचारून घेतला. त्यानंतर दोन महिन्यांनंतर जपानमधील शाळेने कोंढूर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व विविध भेटवस्तू पाठविल्या. बुधवारी हे साहित्य शाळेला उपलब्ध झाले. 

पुस्तकांसह विविध साहित्यांचा समावेश

यामध्ये शैक्षणिक साहित्य, चॉकलेट असलेल्या भेटवस्तू, जपानी भाषेचा इंग्रजीमधून अनुवाद केलेली शुभेच्छापत्रे, पुस्तके, विविध आकाराची जपानी टावेल, बाहुली, नकाशे, चित्र कार्ड, विविध फ्लेवरमधील कॅंडी चॉकलेट आदी साहित्यांचा समावेश आहे. थेट जपानमधील शिक्षक, विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या भेटवस्तू पाहून विद्यार्थी आनंदीत झाले.

कोंढूर शाळेचा विविध उपक्रमांत समावेश

कोंढून येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना जगातील घडामोडीची माहिती व्हावी, यासाठी विविध देशांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. यातून संशोधन वृत्ती, विविध भाषांचे ज्ञान आदींची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थीही शाळेत नियमित हजेरी लावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT