जयंत पाटील 
मराठवाडा

जलसंपदा मंत्री जळकोटच्या सिंचन प्रश्नांकडे लक्ष देतील का?

शिवशंकर काळे

शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरणे, पाणी परवाना घेणे यासाठी दोन तालुक्याच्या चक्करा मारवे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाया जात आहे.

जळकोट (जि.लातूर) : जळकोट Jalkot तालुका हा डोंगराळ भाग आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. तालुक्यातून शेतकऱ्यांना वरदान ठरणारी तिरु नदी वाहते. पंरतू त्यावर बंदरा नसल्याने नदीतील पाणी आंध्रा-कर्नाटकमध्ये Andhra Pradesh वाहून जात आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील Water Resource Minister Jayant Patil हे दोन दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने तालुक्याचा सिंचनचा प्रश्न मिटेल, अशी आशा शेतकऱ्यांसह Farmer नागरिकांची आहे.तालुक्यात उजवा-डावा कालवा आहे. पंरतू नादुरूस्त असल्याने सदरील कामाचा प्रस्ताव अस्थिकरणासाठी शासनाकडे प्रलंबित आहे. तिरु नदीवर सात बॅरेजला तत्त्वतः मान्यता मिळाली असली तरी अजूनही कामाला निधी उपलब्ध झालेला नाही. दरम्यान तालुक्यात बारा साठवण तलाव आहेत. त्याची पाहणी वाढवणा बु (ता.उदगीर) व अहमदपूर जलसिंचन कार्यालयातून पाहिलं जाते. शेतकऱ्यांना पाणीपट्टी Water Tax भरणे, पाणी परवाना घेणे यासाठी दोन तालुक्याच्या चक्करा मारवे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाया जात आहे. जलसंपदा मंत्री उदगीर Udgir दौऱ्यावर असल्यामुळे जळकोटसारख्या डोंगरी तालुक्यातील सिंचन, उजवा-डावा कालवा, जलसिंचन कार्यालय आदी कामे मार्गी लागतील का? अशी आशा शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.Jayant patil can solve irrigation problems of jalkot latur news

जळकोटसारख्या डोंगरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे असेल तर सरकारने तिरु नदीवरील ब्रेक, उजवा-डावा कालव्याची दुरूस्ती, जलसिंचन विभागाचे कार्यालय आदी गोष्टी केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून तो सुजलाम सुफलाम् होईल.

- मेहताब बेग, अध्यक्ष, जळकोट तालुका संरपच संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT