jet airways
jet airways 
मराठवाडा

जेट एअरवेज विमानाला बगळ्याची धडक

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना बगळ्याने धडक दिली. प्रसंगावधान राखत वैमानिकाने सुखरूप लँडिंग केले त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. असे असले तरी पुन्हा परतीच्या प्रवासाला मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला.

जेट एअरवेजचे (नं. 9 डब्ल्यू 355), मुंबईहून औरंगाबादला आलेले विमान चिकलठाणा विमानतळावर लँडिंग करत असताना शेवटच्या टप्प्यात विमानाचा डाव्या पंख्याला पक्षाने धडक दिली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे सुखरूप लँडिंग केले. मात्र याच विमानाने परत मुंबईला जाणाऱ्या 21 प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबईला जाणाऱ्यांमध्ये आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे यांचा समावेश होता. विमान तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचे जेट एअरवेज प्रशासनाने जाहीर केले. त्यानंतर अनेकांनी प्रवास रद्द केला, तर काहींनी सायंकाळच्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT