अंबड : शाळेत जाताना रस्त्यावर सापडलेले मंगळसूत्र पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्याकडे सुपूर्द करताना ओम जाधव, शिवम वाघ व अर्जुन वाघ.  
मराठवाडा

मंगळसूत्र घेऊन विद्यार्थी पोचले ठाण्यात 

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना)  - शाळेत पायी जाताना बुधवारी (ता. चार) सकाळी तीन शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर मंगळसूत्र सापडले. या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवीत अंबडचे ठाणे गाठत पोलिस निरीक्षकांना मंगळसूत्र सुपूर्द केले. 

अंबड शहरातील होळकरनगर येथील सहावी इयत्तेतील ओम हनुमंत जाधव हा मित्र शिवम सुधाकर वाघ, अर्जुन मधुकर वाघ यांच्यासोबत पाचोड मार्गावरील समर्थ विद्यालयाकडे बुधवारी सकाळी पायी जात होते.

शाळेलगतच असलेल्या श्रीसाई मंदिरासमोर त्यांना सोन्याचे मणी, मंगळसूत्र त्यांना आढळले. हे मंगळसूत्र त्यांनी उचलत तालुका पोलिस ठाणे गाठले. ठाण्यात पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांची भेट घेऊन त्यांना मंगळसूत्र सापडल्याचे सांगितले.

अवघ्या बारा वर्षांच्या ओम जाधव व त्याचे मित्र अर्जुन, शिवम यांच्या प्रामाणिकपणाचे पोलिस निरीक्षक नांदेडकर यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले. 

दरम्यान, ओम जाधव, शिवम वाघ, अर्जुन वाघ या बालकांचे प्रभाकरराव पवार, गणेश सपकाळसह पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान आदींनी कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT