Accident Sakal
मराठवाडा

जिंतूर : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; दोन जण गंभीर

संजय पवार आणि हरीश कमिटे असे जखमींची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जि.परभणी) : शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय समोर जिंतूर-येलदरी रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना भिडल्याने दोन्ही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२२) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.

संजय पवार आणि हरीश कमिटे असे जखमींची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मागील तीनचार महिन्यापासून तालुक्यात अपघातांची मालिका थांबता थांबत नसून यात आजच्या (ता.२२) अपघाताची आणखी भर पडली.

मंगळवारी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन समोरील रस्त्यावर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथील पंचेचाळीस वर्षीय संजय पवार आणि शेवडी येथील तीस वर्षीय हरीश कमिटे यांच्या अनुक्रमे एमएच १५, बीएफ २६८० आणि एमएच २२,डब्ल्यू ४२७४ क्रमांकाच्या दुचाकी समोरासमोर जोरात भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले.

यात दोन्ही दुचाकींचेही बरेच नुकसान झाले आहे. यावेळी अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी दोन्ही जखमींना आटोत टाकून शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना परभणी येथे हलविण्यात आले आहे. दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: दररोज १६२ रुपये कमाई असलेल्यांनाच रेशनधान्य; ग्रामीण लाभार्थींसाठी १२१ रुपयांची अट, निकषामुळे ५३ हजार लाभार्थी अपात्र

DEVdutt PADIKKAL: टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी पडिक्कलचा दावा मजबूत! न्यूझीलंड A विरुद्ध पुन्हा मोठी खेळी

Marathi News Live Updates : सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, कंदलगाव आणि अंत्रोळीतून १७ लाखांचे खाद्यतेल, पनीर जप्त; सांगोल्यातही दूध डेअरीवर छापा

Dhamapur Ancient Temple : शिलाहार की यादव काळ? धामापूरमध्ये सापडली अकराव्या शतकातील देखणी मूर्ती; झाडाझुडपांत आढळला ऐतिहासिक राजवाडा अन् मंदिराचे अवशेष

तेव्हापासून एकदाही फटाके फोडले नाहीत... 'सनई चौघडे' फेम मेघना एरंडेने सांगितली ती आठवण; म्हणाली- आई- बाबांना...

SCROLL FOR NEXT