Accident
Accident esakal
मराठवाडा

जिंतूर-परभणी मार्गावर भीषण अपघात; धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जि.परभणी) : जिंतूर परभणी मार्गावर (JIntur-Parbhani Road) शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मैनापुरी शिवारात अज्ञात वाहनांच्या धडकेत (Accident) दुचाकीस्वार ३२ वर्षीय युवक जागीच ठार (Death) झाला असून इतर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गणेश एकनाथ देवकर (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारार्थ परभणी येथे हलविण्यात आले आहे.

जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकाच्या परिसरात हॉटेलचा व्यवसाय करणारा पांगरी (ता.जिंतूर) येथील गणेश देवकर हा हॉटेल बंद करून अशोक अर्जुन नेटके व भानू शंकर देवकर(वय ३२ व २५) या दोन मित्रांसोबत एमएच २२, एआर ५७१४ क्रमांकाच्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना परभणी रोडवरील मैनापुरी शिवारात शेतातून रस्त्यावर आलेल्या अज्ञात वाहनाची जोराची धडक झाल्याने दुचाकीवरील गणेश देवकरचा जागीच मृत्यू झाला तर अशोक नेटके व भानू देवकर हे दोन युवक गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर

शहरातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी डॉ गरड, परिचारिका गावित, सोनवणे, राऊत आदींनी प्राथमिक उपचार केले परंतु दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक शिंदे,पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र वृत्त लिहेपर्यंततरी अज्ञात वाहनाचा शोध लागला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

Sangli News : दिवसाढवळ्या 'खून करणारं गाव' म्हणून मिळाली ओळख, पण प्रवाहाच्या विरोधातही उभं राहिलं गाव!

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना अलर्ट

Panda Dogs in Zoo : प्राणीसंग्रहालयात नव्हते पांडा म्हणून चक्क कुत्र्यांनाच दिला ब्लॅक अँड व्हाईट रंग; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Narendra Dabholkar Case Live Updates: सुटलेल्या आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस, सरकार अपयशी: न्यायाधीश

SCROLL FOR NEXT