sakal
मराठवाडा

मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद, मुलीमध्ये जिंतूरची सायली प्रथम

स्पर्धेत १७ वर्षा खालील मुलांच्या गटात नागपूरच्या साहील लहाने तर मुलींच्या गटात जिंतूरच्या सायली शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: हिंगोली नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शनिवारी ता. दोन घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १७ वर्षा खालील मुलांच्या गटात नागपूरच्या साहील लहाने तर मुलींच्या गटात जिंतूरच्या सायली शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरून शनिवारी या स्पर्धेला सुरवात झाली या स्पर्धेचे उदघाटन आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ, अजय कुरवाडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अभियंता रत्नाकर अडशिरे, बाळू बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत ४० वर्षावरील गटात प्रथम गगन भट, द्वितीय संतोष मस्के, तृतीय धिरज जयस्वाल, चौथे सुधीर देशमुख ( सर्व रा. हिंगोली ) यांनी यश मिळविले आहे.

१७ वर्षा वरील पुरुषांच्या गटात प्रथम छगन बोंबले ( खांबळा ), द्वितीय शुभम शिंदे (सावा ), तृतीय ऋषीकेश मोरे ( इंचा ), मुलींच्या गटात प्रथम अश्विनी जाधव , निकीता म्हात्रे ( दोघी रा. परभणी ), गायत्री गायकवाड ( वैजापूर , औरंगाबाद ) तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम साहील लहाने ( नागपुर ) , द्वितीय ओम कव्हेरकर ( हिंगोली ), तृतीय ओम पोले ( औंढा ), मुलींच्या गटात सायली शिंदे ( जिंतूर ) , शितल जाधव ( औरंगाबाद ) , तृतीय माधवी पानचावके ( उदगिर ) यांनी यश मिळविले आहे.

या स्पर्धकांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. परिक्षक म्हणून रमेश गंगावणे , आर . एम . व्यवहारे , नितीन मोरे , अनिल लोळेवार यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमात पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी देशभक्तीपर गित सादर करुन उपस्थितांची वाहवाह मिळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT