dengue dengue
मराठवाडा

Kalamb Dengue: कळंबमध्ये डेंग्यूचा कहर; शहरात चिमुकलीचा बळी

कोरोना संसर्गाची लाट ओसरली डेंग्यू आजार बळावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

दिलीप गंभीरे

कोरोना संसर्गाची लाट ओसरली डेंग्यू आजार बळावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कळंब (उस्मानाबाद): शहरामध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात डेंग्यूचा प्रकोप झाला आहे. लहान बालकांपासून ते जेष्ठ नागरिक डेंग्यूच्या आजाराराने त्रस्त झाले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील शिवाजीनगर भागातील एका चिमुकलीचा डेंग्यूने बळी घेतल्याची घटना शुक्रवार (ता.२०) घडली आहे. तरीदेखील आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन योग्य भूमिका घेण्यास हात झटकत आहे. शहरातील सर्वच खासगी रुग्णालयात डेंग्यू सदृष्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्नाने हाऊसफुल्ल झाले असताना, आरोग्य प्रशासन मात्र हे सत्य स्विकारायला तयार नाही.

मागच्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक डेंग्यू सदृष्य आजाराने त्रस्त आहेत. कोरोना संसर्गाची लाट ओसरली डेंग्यू आजार बळावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही ठराविक भागांत पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून धूर फवारणी केली. मुळात हे आजार का उद्भवत आहेत यावर सखोल असा अभ्यास आरोग्य प्रशासन व नगरपालिका विभागाने केलेला दिसून येत नाही.

डेंग्यूने घेतला चिमुकलीचा बळी-

शहरातील शिवाजी नगरभागातील एसटी महामंडळामध्ये वाहक पदावर काम करीत असलेले सतीश गंभीरे यांची मुलगी श्रेया गंभीरे (वय-१०) हीला चार दिवसांपूर्वी अचानक ताप आला.तापीने फंणणलेल्या अवस्थेत शहरातील खासगी रुग्णलयात औषधोपचार करून लातूर येथील रुग्णलयात दाखल केले. ताप मेंदूला भिनल्याने ती डेंग्यू आजारापुढे हरली.

पालिका व आरोग्य प्रशासनाचे उदासीन धोरण-

डेंग्यू आजाराच्या प्रकोपला आरोग्य प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन जबाबदार असून नाल्या तुंबलेल्या आहेत. अनेक भागात पाण्याचे डबकीसुद्धा साचलेले आहेत. वाढीव वसाहतीमध्ये नाल्या बांधकाम करण्यात केलेले नाही. त्यामुळे घरातील दुषित पाणी रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने डासांचे प्रमाण वाढलेले आहे. मोठ्या प्रमाणात कर आकारणी करीत असलेले पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT