file photo 
मराठवाडा

मोक्कातील फरार कमल यादव जेरबंद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील मटका माफिया व मोक्कातील फरार आरोपी कमल यादव याला रविवारी (ता. आठ) पहाटेच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली. स्थानिक गुन्ह शाखेच्या या पथकाचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी कौतुक केले आहे. 

शहराच्या वजिराबाद परिसरात असलेल्या दिलीपसिंग कॉलनी भागात ता. पाच सप्टेंबरच्या रात्री हवेत गोळीबार करून दहशत पसरविली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील शेख अन्वर अली अकबर अली, प्रदीप उर्प सोनु लालचंद्र रौत्रे या दोघांना अटक केली होती. त्यानंतर समोर आलेल्या घटनाक्रमानुसार यात रणवीरसिंग उर्फ कालु उर्फ टायगर उर्फ शेरा उर्फ विलास उर्फ देविदास नामदेव पवार आणि विक्रम उर्फ विक्की नंदलाल यादव या दोघांना अट केली. हे चारही जण सध्या कारागृहात आहेत. या गुन्ह्यातील कमल गणेशलाल यादव हा फरार होता. 

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशावरून मोक्का

या पाच आरोपींविरुध्द विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी नांदेड पोलिसांच्या आलेल्या अहवालावरून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियमानुसार (मोक्का) लावण्याची परवानगी दिली. यावरून या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र यातील कमल यादव फरार होता. त्याला अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना दिल्या. यावरून श्री. डोईफोडे यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल नाईक यांनी आपल्या पथकासह कमल यादव याची माहिती गोळा केली. तो नांदेडात असल्याची माहिती त्यांना मिळाली. या पथकांनी नांदेडच्या रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून कमल यादव याला अटक केली.

सोमवारी (ता. नऊ) न्यायालयासमोर हजर करणार

तो सप्टेंबरपासून फरार होता. याला वजिराबाद पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांच्या ताब्यात दिले आहे. वजिराबाद पोलिस कमल यादवला सोमवारी (ता. नऊ) जिल्हा न्यायालयामोर हजर करणार असल्याचे स्थागुशाचे श्री. डोईफोडे यांनी सांगितले. या घटनेमुळे पुन्हा एका नांदेड पोलिसांचे ` सद्रक्षणाय - खलनिग्रहनाय ’ हे ब्रीदवाक्य खरे ठरत आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी (शहर) सिध्देश्‍वर धुमाळ करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT