Keshavraj Temple Sakal
मराठवाडा

Keshavraj Temple : केशवराज मंदिराचा होणार कायापालट; मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटींच्या निधीस मंजुरी

शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरी गावच्या बाहेर केशवराज मंदिर असून, त्याची देखभालीअभावी दुरवस्था झालेली आहे. सद्यःस्थितीत मंदिर भग्न अवस्थेत आहे.

कमलेश जाब्रस

माजलगाव : शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरी गावच्या बाहेर केशवराज मंदिर असून, त्याची देखभालीअभावी दुरवस्था झालेली आहे. सद्यःस्थितीत मंदिर भग्न अवस्थेत आहे.

मंदिराच्या पुनर्वसनासाठी पुरातत्त्व विभागाने आता नऊ कोटी ४४ लाख ८९ हजार १३५ रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. यातून पुरातन केशवराज मंदिराचा कायापालट होणार आहे. शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी गावाच्या बाहेर भग्न अवस्थेतील केशवराज मंदिर आहे.

या मंदिराची निर्मिती इसवि सन बाराव्या शतकात कल्याणी चालुक्य राजवंशाच्या सोमेश्वर तिसरा यांच्या काळात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिरावर यक्ष, गंधर्व, किन्नर आदी कोरीव शिल्प असल्याने हे मंदिर केशवराजाचे असल्याचे सिद्ध होते. मंदिर पूर्वाभिमुख असून, मुखमंडप थोड्या चांगल्या स्थितीत आहे.

मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस तीन फूट उंचीचे घडीव दगडांनी बांधलेले ओटे आहेत. मंदिराच्या बाह्य भागावर पद्म आणि कणी कोरलेले आहेत. सर्व शिल्पकलेवर चालुक्य कलाशैलीचा स्पष्ट प्रभाव दिसतो.

काळाच्या ओघात हे मंदिर क्षतिग्रस्त झाले आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नऊ कोटी ४४ लाख ८९ हजार १३५ रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू होणार आहे.

मंदिरास फ्रेंच पर्यटकांची भेट

केसापुरीच्या विष्णू मंदिरास २०२२ मध्ये फ्रेंच देशातील पर्यटकांनी अभ्यास भेट दिली होती, तर मराठवाडा प्राचीन वास्तमू संवर्धन समितीचे प्रा. श्रीकांत उमरीकर यांनीदेखील भेट दिलेली आहे. मंदिर जीर्णोद्धाराचे काम झाल्यास गाव देशाच्या नाकाशावर येईल. शिवाय पर्यटन वाढण्यास मदत होऊन गावाच्या वैभवातदेखील भर पडेल.

मतदारसंघातील मोगरा, शुक्लतीर्थ लिंबगाव, केसापुरी, मंजरथ, चिंचवणसह इतर ठिकाणच्या पुरातन मंदिरांना निधी मिळावा, यासाठी शासनाकडे मागीलवर्षी प्रस्ताव पाठविला होता. यात पहिल्या टप्प्यात केसापुरी येथील केशवराज मंदिरास निधी मिळाला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होईल.

- प्रकाश सोळंके, आमदार

पुरातत्त्व विभागाने दिलेल्या या निधीतून पूर्णतः मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पायापासून ते शिखरापर्यंत पूर्ववत मंदिर उभारण्यात येणार आहे. निधी मिळण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे, तर पुरातत्त्व विभाग संभाजीनगरचे सहायक संचालक अनिल गोटे यांचे सहकार्य लाभलेले आहे.

- विलास साळवे, ग्रामपंचायत सदस्य, केसापुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Pune Fraud : "तुला 'एमबीबीएस'ला ऍडमिशन घेऊन देतो"; असं बोलून केली सव्वा कोटींची फसवणूक; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

वर्षाच्या शेवटी अमृता खानविलकरची चाहत्यांना खास भेट! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार

Pune News : नागरिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सिंहगड रस्त्यावर 'नऱ्हे पोलिस स्टेशनचे' दिमाखात उद्घाटन!

Latest Marathi News Live Update : जायगावला साकारणार जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन

SCROLL FOR NEXT