online 
मराठवाडा

कळमनुरीत शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन; कृषी तज्ञांचा सहभाग

गोदा फार्म शेतकरी उत्पादक कंपनी मागील काही वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व पेरणीकरिता पीक पद्धतीची माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धती व पेरणीची आधुनिक पद्धतीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील गोदा फार्म शेतकरी उत्पादक (Goda farm product) कंपनीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन तीन दिवसीय ऑनलाइन मेळाव्याचे (online)आयोजन केले आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, हळद, या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून ऑनलाइन मेळाव्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु (Agri univecity vc dr. dhavan) सहभागी असणार आहेत. (Kharif- pre-season- guidance- to -farmers- in Kalamanuri- Involvement- of agricultural- experts)

गोदा फार्म शेतकरी उत्पादक कंपनी मागील काही वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व पेरणीकरिता पीक पद्धतीची माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धती व पेरणीची आधुनिक पद्धतीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याकरिता आयोजित मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती राहत असल्याचे चित्र होते. मात्र आजाराचा हा काळ पाहता शेतकरी वर्ग खरीप पेरणीपूर्व मार्गदर्शनापासून वंचित राहू नाही याकरिता गोदा फार्म कंपनी कडून शुक्रवार ता. 21 ते रविवार ता. 23 असे तीनदिवसीय खरीप हंगाम पूर्व खरीप हंगाम पूर्व मार्गदर्शन ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन केले आहे.

हेही वाचा - लॅपटॉपवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्क्रीनवर छायाचित्र दिसते. त्यामुळे त्यांची हालचाल त्यात टिपली जाते. तर मोबाईलवर परीक्षा देणाऱ्यांच्या आयपी ऍड्रेसद्वारे त्यांची हालचाल टिपली जात आहे.

शुक्रवार ता. 21 ला सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या ऑनलाईन सभेमध्ये सोयाबीन पिकाबाबत प्रमुख मार्गदर्शक परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहेत्रे यांनी मार्गदर्शन केले आहे. तर अध्यक्षीय मार्गदर्शन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केला, शनिवार (ता. 22) ला तूर पिकाबाबत तूर संशोधन केंद्र बदनापूर येथील डॉ. डी. के. पाटील व उद्योजकीय मार्गदर्शन पंचगंगा सीड्सचे चेअरमन प्रभाकर शिंदे हे करणार आहेत,

रविवार (ता. २३) ला हळद पिका बाबत सहयोगी प्राध्यापक काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर महाविद्यालय किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील डॉ जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तर समारोपीय मार्गदर्शन सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख हिंगोली हे करणार आहेत. सदरील कार्यक्रमाचे संपूर्ण प्रक्षेपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गोदा फार्म या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन मेळाव्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन गोदा फार्मचे व्यवस्थापकीय संचालक नितीन चव्हाण व वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद पाटील यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT