जालना : कुणबी मराठा हक्क परिषदेत रविवारी बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले. यावेळी आरेाग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राहुल पाटील, अर्जुन खोतकर, डॉ.बबनराव तायवाडे आदी. 
जालना : कुणबी मराठा हक्क परिषदेत रविवारी बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले. यावेळी आरेाग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राहुल पाटील, अर्जुन खोतकर, डॉ.बबनराव तायवाडे आदी.  
मराठवाडा

मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांचा ओबीसीत समावेशासाठी प्रयत्न : पटोले

सकाळ वृत्तसेवा

जालना -  विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. कुणबी मराठा सेवा संघ व कुणबी युवा संघाच्या वतीने शहरातील सुयेशा लॉन्स येथे रविवारी (ता.एक) घेण्यात आलेल्या कुणबी मराठा हक्क परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राहुल पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, कुणबी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राम सावंत, राम कुऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. पटोले म्हणाले, की राज्यातील कुणबी समाज ओबीसीत समाविष्ट आहे, असा माझा समज होता. मात्र, वाणदेशी, अक्करमाशी अशा पोट जाती लावल्या गेल्याने मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांचा समावेश ओबीसीत नसल्याचे आता कळाले. वर्ष २००९ मध्ये कुणबी समाजाचे झालेले सर्वेक्षण तपासून विदर्भातील कुणबी समाजाप्रमाणे मराठवाड्यातील कुणबी समाजाचा ओबीसीत समावेश करण्याबाबत सरकारला भाग पाडू. कुणबी समाजाने पोट जातीचा उल्लेख करणे बंद करावा, यापुढे फक्त कुणबी लावण्याचे आवाहनही या परिषदेत त्यांनी केले. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की कुणबी मराठा समाजाच्या मागण्या रास्‍त असून, विदर्भातील समाजाला याचा मोठा आधार मिळाला आहे. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील कुणबी समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. या परिषदेत, मराठवाड्यातील कुणगी मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय समाजात समावेश करण्यात यावा. सारथी संस्‍थेची स्‍वयत्ता कायम ठेवावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सवलतींचा कुणबी मराठा समाजाला लाभ मिळावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व स्‍वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी करण्यात आली. परिषदेस राज्यभरातील कुणबी समाजबांधवांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT