मंठा : गावाकडे पायी जाताना पहाटे मुख्य रस्त्यावर थांबलेले कुटुंब.  
मराठवाडा

साहेब, पाय तुटायची वेळ आलीय 

कृष्णा भावसार

मंठा (जि. जालना) -  ‘'रस्त्याने गावात कोणी येऊ देत नाही. उघड्यावर रात्र काढावी लागतेय, काहीजण भाजी-भाकरी देतात, आता मदतच करायची असेल तर गावाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा, साहेब, सतत चालून-चालून आता पाय तुटण्याची वेळ आलीय'', अशी कैफियत एका महिलेने मांडली. 

कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण जग हादरले आहे. देशात लॉकडाउन झाल्याने सर्व कामधंदे, उद्योग-व्यवसाय बंद पडले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंब खूप वर्षांपासून कामधंद्याच्या शोधात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांत स्थलांतरित झाले होते. त्यांच्या हाताला आता काम नसल्याने व जवळचा पैसा संपल्याने अनेकजण लहान मूल कडेवर घेऊन महिलांसह दररोज तीस ते चाळीस किलोमीटर चालत गाव गाठत आहेत.

सोबत ओझं नको म्हणून आहे त्या कपड्यांनिशी निघालेल्या पादचाऱ्यांची रस्त्याने अनेक ठिकाणी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते सकाळी चहा, नाश्ता, दुपारी व सायंकाळी जेवण, पाणी याची व्यवस्था करीत आहेत; परंतु या पायी चालणाऱ्यांना गावात प्रवेश नसल्याने रात्री अंथरुण-पांघरुण नसल्याने उघड्यावर झोपावे लागत आहे. यात महिला, लहान मुले, तरुण मुली यांचे हाल होत आहेत.

जेवण पुरविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे साहेब जेवण ठिकठिकाणी मिळत आहे; परंतु आता चालून-चालून पाय तुटायची वेळ आली आहे. मदत करायची तर एखाद्या वाहनाची व्यवस्था करा, अशी विनंती करीत आहेत. या चालणाऱ्या कुटुंबांची ते निघालेल्या ठिकाणी आरोग्य तपासणी झालेली नाही. रस्त्याने कोणत्याच गावात त्यांना प्रवेश नाही. त्यामुळे शासनाने पायी जाणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मूळ गावापर्यंत वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT