file photo 
मराठवाडा

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा ३१ कोटी ५२ लाखाचा मावेजा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  लोहा - नांदेड राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या धीम्या गतीच्या कामाला आता वेग आला आहे. पार्डी ,कारेगाव भागात महामार्गात येणारी पक्की घरे पाडण्यास प्रारंभ झाला आहे. लोहा शहरालगतच्या बायपाससाठी जवळपास ६४ एकर जमीन संपादित करण्यात आली. त्याचा ३१ कोटी ५२ लाखाचा मोबदला ३०६ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

लोहा शहरातून राष्ट्रीय महामार्ग ३६१ रस्ता जाणार नाही त्यासाठी जुन्या शहराला वळसा घालून बायपास जाणार आहे. २५ हेक्टर ४४ आर एवढे क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या कार्यालयात ता. १० फेब्रुवारी रोजी ३०६ बाधित जमीन मालकांना नोटीस देवून बोलविण्यात आले होते. त्यासाठी ३१ कोटी ५२ लाख रुपये मावेजा दिला जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पार्डी कारेगाव- सोनखेडमध्ये पाडापाडी

नॅशनल हायवे ३६१ साठीच्या कामाला गती आली आहे. पार्डी- कारेगाव या गावात रस्त्यात येणारी पक्की घरे बसस्थानक पाडण्यात येत आहे. सोनखेडमध्ये अद्याप काम सुरु झाले नाही. या पक्क्या घरांचा मावेजा संबंधितांना दिल्यानंतरच कामाला आरंभ झाला आहे.

शहरी भागाला मावेजाचा फटका

३६१ नॅशनल हायवेसाठी लोहा शहरातील ज्या मालमत्ता धारक व शेतकर्‍यांचे भूसंपादन केले त्यांना ग्रामीण भागापेक्षा कमी गुणांकानुसार दर मिळाला. याचा आर्थिक फटका शेतमालक मालमत्ताधारकांना बसला आहे. यांना न्याय मिळावा यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु आहेत. असे कृती समितीचे अध्यक्ष माणिकराव मुकदम यांनी सांगितले. या अनुषंगाने राजेश मुकदम यांनी गुणांक कसे व किती त्यानुसार मावेजा मिळायला पाहिजे असे सांगितले.

लोह्यातून सिमेंट रोड

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बायपास टू बायपास म्हणजे बेरळी फाटा ते साई हॉटेल हा शहरातून जाणारा रस्ता सिमेंट करण्याचे जाहीर आश्वासन दिले. त्या अनुषंगाने नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. या बाबत लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT