कुंभार पिंपळगाव : येथील बॅंकेची इमारत. 
मराठवाडा

इंग्लिश बोला, नसता कर्ज मिळणार नाही, शेतकऱ्यांची फरफट

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना)  - मराठीतलं त्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी आम्हाला बोलता येईना; अशी शेतकऱ्यांची गत झाली आहे. येथील महाराष्ट्र बॅंकेत अमराठी अधिकारी असल्याने शेतकरी आणि ग्राहकांना हिंदी आणि इंग्रजीत बोलावे लागत आहे. लोकांचे बोलणे अधिकाऱ्यांना समजत नाही तर अधिकाऱ्यांचे बोलणे लोकांना समजत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

वर्ष 1973 पासून येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. 40 खेड्यासह परिसरातील शेतकरी, व्यापारी, विविध कर्मचारी, सहकारी संस्था आदींसह महिला बचतगट, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवक यासह हजारो ग्राहक या शाखेशी जोडलेले आहेत; मात्र अलीकडेच बॅंकेचा कारभार सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचे चित्र आहे. बॅंकेत अमराठी अधिकाऱ्यांचा भरणा वाढला आहे. शाखाव्यवस्थापक आंध्रप्रदेशचे, उपशाखा व्यवस्थापक हरियाणाचे तर दुसरे उपशाखा व्यवस्थापक मध्यप्रदेशचे आहेत.

उपव्यवस्थापकाकडेच बहुतांश कामे आहेत. या अधिकाऱ्यांना मराठी कळत नाही यामुळे दररोज बॅंकेत वाद होतात. शाखेत खेड्यातील, ग्रामीण भागातील कमी शिक्षित अनेक जणांचे व्यवहार आहेत तर अनेक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे वर्षभरापासून ठप्प आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजना, अतिवृष्टीचे अनुदानही वेळेवर मिळत नाही. बॅंकेत अनेकजण शेतकऱ्यांशी हुज्जत घालतात, यामुळे सर्वसामान्यांना बॅंकेत जावेच वाटत नाही. येथील शाखेत मराठी समजणारे अधिकारी द्यावेत अशी शेतकरी व ग्राहकांची मागणी आहे. 
दरम्यान, याविषयी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, ""हम इसके बारे में कुछ नहीं बोल सकते, हेड ऑफिस से पुछो,'' असे सांगितले जाते. 

महाराष्ट्र बॅंकेचा जुना खातेदार आहे. वर्षभरापासून मंजूर झालेले कृषी कर्ज दिल्या जात नाही. अधिकाऱ्यांना आमची अडचण समजत नाही. उडवाउडवीची उत्तरे देऊन ते वाद करतात. यासाठी मराठी अधिकारी असणे गरजेचे आहे. 
-अजिमखॉंन पठाण 
शेतकरी 

येथील शाखेत गेल्यास अधिकाऱ्यांना मराठी कळत नाही आणि ते काय म्हणाले आम्हाला कळत नाही. खेड्यातील निरक्षर लोकांना ते बाहेर निघा अस सांगतात. बॅंकेत पंतप्रधान योजनेचे हप्ते, अनुदान आले की नाही हे सांगितले जात नाही. या शाखेत मराठी समजणारे अधिकारी द्यावेत. 
-अशोक राजेजाधव 
शेतकरी, अरगडे गव्हाण 

बॅंक अधिकाऱ्यांना विशिष्ट भाषा शिकणे बंधनकारक नाही. प्रत्येक बॅंकेत स्थानिक राज्यातील लिपिक, कर्मचारी वर्ग असतो. स्थानिक भाषेबाबत अडचण आल्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित असते. 
- एन.एम. ईलमकर, 
जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBA CET Result: एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीच्या सीईटीचा निकाल जाहीर; राज्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

Fine Art CET: कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर : सिंधुदुर्गचा विलास तवटे १९० पैकी १६३ गुणांसह राज्यात अव्वल

Joy Street Event : चऱ्होलीत उद्या ‘जॉय स्ट्रीट’ची पर्वणी; ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळणार उत्साह, जल्लोष अन् आनंद

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Gangapur Government Hospital : सरकारी रुग्णालयात माणुसकी मेली! प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला डॉक्टर-नर्सनी दवाखान्यातुन हकलले

SCROLL FOR NEXT