Prime Minister Narendra Modi And BJP  esakal
मराठवाडा

Latur : लातूर जिल्ह्यात भाजपचे 'धन्‍यवाद मोदीजी' अभियान

लाभार्थींचे पत्र आमदार रमेश कराड यांच्‍याकडे सुपूर्द

सकाळ डिजिटल टीम

लातूर : प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात `धन्यवाद... मोदीजी` हे अभियान राबवले जात आहे. एकाच दिवसात रेणापूर तालुक्यात केंद्र शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांनी लिहून दिलेले साडे सातशेहून अधिक पोस्ट कार्ड पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने गरिबांना गरीबच ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानले. घरकुल, उज्वला गॅस, शेतकरी पेन्शन, मोफत अन्नधान्याचे वितरण यासह विविध योजना सुरू केल्या. त्याचा लाभ गरजू लाभार्थींना मिळाला. छोट्या छोट्या कुटुंबात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षा सूचनेनुसार आमदार कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात हे अभियान सुरू झाले आहे. रेणापूर तालुक्यातील गावागावात शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख आणि भाजपाचे पदाधिकारी केंद्र शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या भावना जाणून घेत आहेत. दोनच दिवसात साडे सातशेहून अधिक लाभार्थ्यांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले.

यावेळी तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, धन्यवाद मोदीजी अभियानाचे तालुका संयोजक सतीश आंबेकर, माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, गोपाळ शेंडगे, संतोष तुरूप, अॅड. किशोर श्रीगिरे, अॅड. सुधाकर बोराडे, अॅड. माधव गुडे, गोविंद गोमारे,मारुती गालफाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, ललिता कांबळे, माजी सरपंच सुकेश भंडारे, शक्तिकेंद्र प्रमुख हरीकृष्ण गुरले, गोपाळ शेंडगे, अमर चव्हाण, रंजना गालफाडे, गोविंद नरहरे, अॅड. किशोर शिरगिरे, वामन संपत्ते, गणेश तूरूप, सुधाकर बोराडे, अरुण कांबळे, काशिनाथ धायगुडे, दत्ता आंबेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT