emergency shops emergency shops
मराठवाडा

काय सांगता! पाट्या बदलून अचानक दुकाने झाली अत्यावश्यक

काहींनी तर दुकानाची केवळ पाटी बदली असून काहींनी पूर्वीच्या पाटीवर दुसरी पाटील लावली आहे

सकाळ वृत्तसेवा

लातूर: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने बुधवारी (ता. 14) रात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केल्यानंतर काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नवी शक्कल शोधली आहे. जुन्याच व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचे नवे रूप देऊन दुकाने सुरू ठेवली आहेत. यात काहींनी तर दुकानाची केवळ पाटी बदली असून काहींनी पूर्वीच्या पाटीवर दुसरी पाटील लावली आहे. यातूनच लॉकडाऊनमध्ये अनावश्यक असलेली दुकाने अचानक अत्यावश्यक सेवेत येऊन उघडी राहिली आहेत.

यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लागू होऊनही लोकांची गर्दी कमी होत नसल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सरकारने सहा एप्रिलपासूनच राज्यात निर्बंध लागू केले आहेत. यात केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत किराणा, भाजीपाला, फळे, दुध, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ, चिकन, मटन, मासे व अंडी विक्रीची दुकाने आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीचे निमित्त करून नागरिक घराबाहेर पडत आहेत. तर लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या काही व्यावसायिकांनीही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहेत.

दुकानात भाजीपाला, किराणा, फळे, बेकरी, अंडी ठेऊन पूर्वीच्या व्यवसायाची दारे उघडी ठेवली आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही ठिकाणी पूर्वीचेही व्यवसाय सुरू राहिले आहेत. काही दुकानदारांनी आपला पूर्वीचा व्यवसाय बंद करून अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह सुरू केल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकानांची संख्या अचानक वाढली आहे.

दुकानदारांनी पोलिसांच्या चौकशी तोंड देण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्रही काढून घेतले आहे. ही दुकाने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू रहात असल्याने नागरिक खरेदीचे निमित्त करून घराबाहेर पडत आहेत. यामुळे नावालाच कडक असलेल्या लॉकडाऊनचा काहीच फरक पडत नसल्याचे चित्र दिसत आहे. बँकांमध्येही कमालीची गर्दी दिसत असून रस्त्याकडेच्या व्यावसायिकांकडूनही निर्बंधाचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Weather Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, अनेक भागात ‘कोसळधार’; आणखी 'किती' दिवस पावसाची शक्यता!

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून; मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT