Latur corona update 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात दहा महिन्यांत दोन लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या

हरी तुगावकर

लातूर : जिल्ह्यात दहा महिन्यांत दोन लाख एक हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात २४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी २३ हजार २५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारादरम्यान ६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४२ जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी १७६ जण घरी उपचार घेत आहेत.


जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. सुरवातीच्या काळात आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला. त्यानंतर ॲन्टीजेन चाचण्या सुरु झाल्या. दहा महिन्यांत दोन लाख एक हजार ९०३ जणांच्या कोरोना चाचण्‍या झाल्या. यात एक लाख २४ हजार १८२ हजार जणांच्या ॲन्टीजेन तर ७७ हजार ७२१ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या काहीशी कमी होत असली तरी रोज सरासरी ३० ते ४० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहेच. दरम्यान, सध्या कोरोना योद्ध्यांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु आहे.

महिनानिहाय रुग्णसंख्या
एप्रिल २०२०---१६
मे २०२० ---११९
जून २०२०--२१४
जुलै २०२०--१८५१
ऑगस्ट २०२०---५९११
सप्टेंबर २०२०---९१८८
ऑक्टोबर २०२०--३०२२
नोव्हेंबर २०२०---१५५५
डिसेंबर २०२०---११५०
जानेवारी २०२१---११९५

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनचं वादळ... ११ चौकार अन् ४ षटकार! सूर्या दादासोबत १२२ धावांची भागीदारी अन्...

Pune Grand Tour: ''सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वाहतुकीवर फारसा ताण नाही'', पुणे पोलिस नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

MSCE Exam 2026 : प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची विभागीय स्पर्धा परीक्षा ३-४ फेब्रुवारीला ऑनलाईन

Pune Crime News : ई-सिगारेट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रेत्यांवर छापे, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT