Latur Crime News Nilanga 
मराठवाडा

'ड्राय डे'ला पोलिसांचे सात ठिकाणी छापे, सात जणांवर कारवाई

दत्ता बोंडगे

औराद शहाजांनी (जि.लातूर) : औराद शहाजांनी (ता.निलंगा) पोलिसांनी ड्राय डे असताना सुध्दा अवैध मार्गाने देशी विदेशी दारू विकणाऱ्या सात ठिकाणी छापे मारून सात जणांवर कारवाई करून मुद्देमाल 15 हजार रुपयांची दारू जप्त केली आहे.
आज शुक्रवार (ता.१९) दुपारी दोनच्या सुमारास औराद  पोलिसांच्या वतीने अवैध दारू विक्रीच्या विरोधात धडक मोहिम राबविण्यात आली.

यात सात ठिकाणी औराद, तगरखेड, हालगरा, कालमुगळी, अंबुलगा या ठिकाणी  धाडी मारण्यात आल्या. यात विष्णु शंकर अंतररेड्डी, अमृत माणिक सादनांदे,  सुरेश थेटे (रा.तगरखेड), राजेंद्र रामराव चिटकुटे (रा.हालगर), राजू उस्मान  मुल्ला अंबुलगा, श्रीमंत रामराजे  पोतराजे (रा.सावरी), शर्णप्पा कल्लापा आवळे (कलमुगळी) यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध  औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक  सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ बरडे, सुनिल पवार आदींनी ही कारवाई केली आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi in India : लिओनाल मेस्सीचं भारतात आगमन! फुटबॉलप्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी, एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी; पाहा VIDEO

Teacher Video Viral : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; शाळेत घुसून शिक्षकाला बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंढरपूरहून तिरुपतीसाठी आजपासून नवी रेल्वे, अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

'लोकांचं माझ्यावर प्रेम म्हणून ते ट्रोल करतात' गौतमी पाटील ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलली, म्हणाली...

Pune Book Mahotsav : ‘लार्जेस्ट डिस्प्ले’चा विश्वविक्रम; भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अनोखे अभिवादन

SCROLL FOR NEXT