ST Bus 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात चक्क बसस्थानकातून एसटीच चोरट्यांनी पळवली

दत्ता बोंडगे

औराद शहाजानी (जि.लातूर) : औराद शहाजानी (ता.निलंगा) येथील बसस्थानकात गुरुवारी (ता. चार) मध्यरात्री मुक्कामी असलेली बस चोराने पळवली. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली बस रात्रीच मिळाली. नंतर घटनेचा पंचनामा करून ती एसटी महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली.


या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगा आगारातील एमएच-२० बीएल ०२७१ क्रमांकाची एसटी बस गुरुवारी मध्यरात्री औराद शहाजानी येथील बसस्थानकात मुक्कामी होती. वाहक व चालक बसस्थानकात झोपले होते. ही मुक्कामी असलेली बस अज्ञात चोराने रात्री अडीचच्या दरम्यान पळवली. ही बाब लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पेट्रोलिंग करीत पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबविली. पोलिसांना शेळगी येथे ही बस सापडली. चोराचा शोध सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी दिली.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुटुंबाला अडवून ६ जणांना कालव्यात फेकलं, आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू; महाराष्ट्रातून गुजरातला कामासाठी जाताना धक्कादायक घटना

IDBI Bank Strike : अडीच लाख बँक कर्मचारी संपावर; 'या' दिवशी बँका राहणार बंद, महत्त्वाची कामे आधीच उरकून घ्या

Raosaheb Khevare case: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : मेळघाटातील प्रकल्पावरून अदानी समूहाला नोटीस

Pune City : पुणे शहर विद्रूपीकरण करण्यात भाजपचेच नेते अव्वल! दोन नेत्यांनी पटकावला नंबर, पाहा संपूर्ण यादी!

SCROLL FOR NEXT