Amit deshmukh Canva
मराठवाडा

Latur : पॅरामेडिकल कोर्सला ‘अच्छे दिन’

अमित देशमुख ; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमात समावेश

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्यातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (ता. चार) दिले आहेत. त्यामुळे घरघर लागलेल्या या अभ्यासक्रमाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सला घरघर लागली आहे. शासनाचे धोरण, महाविद्यालयांची उदासीनता याला कारणीभूत ठरत आहे. ना प्रवेश ना प्रसिद्धी यामुळे हे अभ्यासक्रमच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील हे तेरा अभ्यासक्रम असून सुमारे दोन हजार जागा आहेत. राज्य शासनाने याकडे लक्ष दिले तर शासकीय, खासगी आरोग्य क्षेत्रासाठी दरवर्षी दोन हजार कौशल्य असलेले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या विषयाला ‘सकाळ’`ने नऊ सप्टेंबरच्या अंकातून वाचा फोडली होती. याची दखल अमित देशमुख यांनी घेतली आहे.

देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सबाबत काल मुंबईत बैठक घेतली. सध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १३ पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम सुरू असून साधारणपणे दोन हजार जागा उपलब्ध आहेत.

या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी जिल्हास्तरावरील महाविद्यालयांमार्फत अधिकाधिक वृत्तपत्रांत प्रसिद्धी द्यावी, हे कौशल्यावर आधारित पदवी अभ्यासक्रम असून त्यांची आवश्यकता कोविड-१९ काळात दिसून आली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे लक्ष देऊन त्याची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये समावेश करावा, अशी सूचना देशमुख यांनी दिल्या.

उच्चस्तरीय समिती

तेरा अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, याबाबतचा अभ्यास करून त्यांची वैद्यकीय शिक्षण संचालकांनी पुनर्रचना करावी, अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमामध्ये आवश्यक बदल व श्रेणी वर्धनाच्या दृष्टीने अभ्यासगट म्हणून उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याची पुनर्रचना करावी, अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT