Sakal 
मराठवाडा

Crime News: सहायक निबंधकांना मारहाण; गृहनिर्माण संस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक

विकास गाढवे

लातूर: तालुक्याचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) अशोक कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेचा माजी अध्यक्ष अशोक पंढरीनाथ मलवाडे (वय 68) याला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (ता. 26) सकाळी साडेदहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कदम यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. घटनेनंतर सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम बंद ठेऊन घटनेचा निषेध केला.

पोलिसांनी सांगितले की, माजी अध्यक्ष असलेल्या अशोक मलवाडे याच्या स्वातंत्र्य सैनिक संग्राम सहकारी गृहनिर्माण संस्थेत गेल्या काही वर्षापासून प्लॉट वाटपावरून वाद सुरू आहेत. या प्रकरणाची उपविभागीय अधिकारी सुनिल यादव यांच्याकडे सुनावणीही सुरू आहे. संस्थेला सरकारने जमिन उपलब्ध करून दिलेली आहे. दरम्यान संस्थेतील माझा प्लॉट दुसऱ्याला दिला असून माझी फसवणुक झाली आहे, असा दावा करत अशोक मलवाडे (रा. सिद्धार्थ सोसायटी, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लातूर) हा बुधवारी सकाळी सहायक निबंधक कदम यांच्याकडे केला.

फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करा, असे तो कदम यांना म्हणू लागला. या वेळी कदम यांनी त्यांना तुमची फसवणुक झाली असेल तुम्ही स्वतः गुन्हा दाखल करा, अशी सूचना केली. त्यावरून मलवाडे याने शिवीगाळ करत कदम यांना मारहाण करायला सुरवात केली. मारहाणीत त्याने कदम यांचा शर्टही फाडला. तेथे उपस्थित प्रमाणित लेखा परिक्षक तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत कदम यांना सुटका केली. एका कर्मचाऱ्याने लागलीच पोलिसांना दूरध्वनी केला. मलवाडे हा मारहाण करून तिथेच बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

या प्रकरणी श्री. कदम (वय 53) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मलवाडे याच्याविरूद्ध मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सहकार विभागात खळबळ उडाली. काहीच चुक नसताना कदम यांना मारहाण झाल्याने विभागातील अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले. सर्वांनी या घटनेचा निषेध केला व दोषीवर कडक कारवाईची मागणी करत दिवसभर काम बंद आंदोलन केले. दरम्यान मलवाडे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT