rain in jalkot 
मराठवाडा

जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; आंब्याच्या बागांचे नुकसान

शिवशंकर काळे

जळकोट (जि लातूर): शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह आज (ता.दहा) चार वाजता पाऊसाला सुरूवात झाली. त्यामुळे आंब्याच्या बागांची मोठ्या प्रमाणात फळ गळती होऊन मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी चारच्या सुमारास आचानक आकाशात काळे ढग जमले होते. चार पासून वादळी वारा, विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस सुरु होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याला फळ लागले होते. दहा -पंधरा दिवसांत आंबा खाण्यासाठी येत होता. पंरतु अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे आंब्याची गळती झाल्याने बागायतदार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या भोवती फिरत असताना आता या वादळी वारा व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचा कडकडाटसह मोठा पाऊस झाला. त्यामुळे लाईट गुल झाली होती.

दरम्यान अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायदार व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

अवकाळी पाऊसामुळे चाळीस टक्के आंब्याची गळती झाली असून पडलेला आंब्याला कोणताही ग्राहक हात लावत नाही. त्यामुळे तोडाला आलेला घास अवकाळी पाऊसाने हिरावून घेतला असून पंचनामा करून शासनाने मदत करावी.

-सुनिल अवलवार (आंबा बागायतदार जळकोट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ठाकरेंचे आमदार गुवाहाटीला कसे नेले? बँकेतून लोन तर नव्हतं ना? राज ठाकरेंनी सांगितलं ५० खोक्यांचं गणित...

CM Devendra Fadnavis: राज्यात विलासरावांचे योगदान मोठे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक!

WTC Standings: ऑस्ट्रेलियाने जिंकली Ashes मालिका, इंग्लंडवर ४-१ असा दणदणीत विजय अन् मावळल्या भारताच्या फायनल गाठण्याच्या आशा

Dr. Madhav Gadgil: पर्यावरण चळवळीचा वैज्ञानिक आधार हरवला, डॉ. माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन!

Latest Maharashtra News Updates : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून

SCROLL FOR NEXT