govt help 
मराठवाडा

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सात कोटींचा दुसरा हप्ता

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): तालुक्यात जून ते आक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता शेतकऱ्यांना दुसरा हप्प्ता सात कोटी १९ लाख रुपयाचा निधी तहसिल कार्यालयात जमा झाला असून लवकरच विविध बँकेत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

तालुक्यात सततच्या पाऊसामुळे खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबीन पाण्यात गेले होते. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. यापूर्वी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात शासनाकडून सात कोटी रूपयांची मदत झाली होती. राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सात कोटी एकोनिस लाख रुपयांचा दुसरा हप्ता तहसिल कार्यालयात जमा झाला आहे.

दरम्यान महसूल, कृषि विभागाला राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. वरील दोन्ही विभागांनी तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवून दिला होता. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना खरिप पिकांना प्रति हेक्टर दहा हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकांना प्रती हेक्टर पंचवीस हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा करण्यात येणार असल्याची माहिती, तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.

तहसिल कार्यालयात सात कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. शुक्रवारपर्यंत तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.-संदीप कुलकर्णी तहसीलदार जळकोट.

(edited by- pramod sarawale) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

SCROLL FOR NEXT