vilasrao deshmukh and gopinath munde statue 
मराठवाडा

विलासरावांच्या शेजारी गोपीनाथरावांचा पुतळा; मृत्यूनंतरही दोन मित्रांची साथ कायम

विकास गाढवे

लातूर: दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांची राजकारणातील जगावेगळी मैत्री आजरामर राहणार आहे. देशमुख यांच्या जिल्हा परिषदेतील पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला सोमवारी (ता. आठ) जिल्हा परिषदेने चालना दिली. पुतळा उभारणीसाठी अर्थसंकल्पात साठ लाख रुपयांची भरीव तरतूद करताना दुसरीकडे रेणापूर पंचायत समितीच्या आवारात मुंडे यांचे स्मारक उभारण्याचाही निर्णय घेतला. या ठरावाला मंजूर करताना दुसरीकडे देशमुख यांच्या स्मृतीभवनासाठी लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानाची जागा सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांत्तरीत करण्याला सभेने मान्यता दिली.

मागील आठवड्यात काही कारणांवरून तहकूब झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. यात सुरवातीला अर्थसंकल्पाचा विषय घेण्यात आला. अर्थ सभापती संगीता घुले यांनी अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे सांगत त्यांनी ३५ कोटी ४९ लाख रुपये उत्पन्नाचा आणि १९ कोटी ३७ लाख रुपये खर्चाचा तपशील सांगितला. काही विभागासाठी अनुषेशासह तरतूद करण्यात आली. यात समाजकल्याण विभागासाठी अनेक कोटी ८४ लाख, दिव्यांगांसाठी एक कोटी तीस लाख, महिला व बालविकास विभागासाठी एक कोटी २२ लाख, थकीत वेतन, मानधन, कुटुंब निवृत्ती वेतन व निवृत्तीचे लाभ देण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना दोन कोटीची तरतूद केली.

यात गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष निर्माण करून साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. याच विषयाच्या अनुषंगाने सदस्य नारायण लोखंडे यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाही पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर होऊनही त्यासाठी काहीच तरतूद केली नसल्याने खंत व्यक्त केली. त्यावर अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी निलंगेकरांच्या पुतळ्यासाठी सरकारकडून नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने तरतूद केली नसल्याचा खुलासा केला.

स्मृतीभवनासाठी जागा हस्तांत्तर
लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानात विलासराव देशमुख यांचे स्मृतीभवन उभारण्यासोबत तिथे दक्षिण मराठवाड्याचे दर्शन घडविणारे प्रादेशिक शासकीय संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी निवासस्थानाची जागा ग्रामविकास विभागाकडून सांस्कृतिक विभागाकडे हस्तांत्तरीत करण्याला मान्यता देण्याचा विषय सभेत आला. बराचवेळ विषयावर चर्चा झाली. जागा हस्तांत्तर झाल्यावर त्यावर जिल्हा परिषदेची मालकी राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गोंधळ झाला. श्री. लोखंडे, सोनाली थोरमोटे व विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. यातच सभापती घुले यांनी मुंडे यांच्या रेणापूर येथील स्मारकाचा व जागा हस्तांत्तरणाचा विषय मांडला. सदस्य सुरेश लहाने यांनी त्याला अनुमोदन दिले. शेवटी जागा हस्तांत्तर व मुंडे यांच्या स्मारकाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून लैंगिक अत्याचार व खंडणी; आरोपीस २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी!

BIGG BOSS MARATHI 6: स्वर्ग पाहाल की नर्क? 'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा; कोण करणार सूत्रसंचालन

Raj Thackeray’s Emotional Tribute to Dharmendra : ... पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी – राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!

Anna Hazare : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोक आंदोलन ग्लोबल पीस फाउंडेशन’ची नवी दिशा!

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये तणाव

SCROLL FOR NEXT