Bulls Died In Fire 
मराठवाडा

मेहनतीने सांभाळलेल्या बैलांना पाहून मालकाने चक्क फोडला हंबरडा!

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) :  शिरोळ (वां) (ता.निलंगा) येथील शेतकरी मैनोद्दीन तांबोळी यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागून गोठ्यात बांधलेले तीन बैल आगीत  होरपळुन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी रविवारी (ता.चार) घडली. वयोवृध्द मैनोद्दीन तांबोळी यांनी होरपळलेल्या बैलांना पाहून चक्क हंबरडा फोडला. दीड लाखांची बैलजोडी अन् पन्नास हजाराचे (पारडू) असे दोन लाख व इतर साहित्य असे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.


शिरोळ-वांजरवाडा (ता.निलंगा) येथील मैनोद्दीन तांबोळी याची शेती आहे. संध्याकाळी घराकडे जातांना गोठ्यात बैल, वासरे, म्हैस बांधून घराकडे जात असत. शिवाय गोठ्यात शेती उपयोगी साहित्य पाईप, मोटार, शेतीचे अवजारे ठेवली होती. शनिवार (ता.तीन) व रविवारी (ता.चार) मध्यरात्री अचानक गोठ्याच्या बाजुला असलेल्या  कडब्याची बनीम व ऊसाच्या हिप्पीला अचानक आग लागली होती. जवळच बाजूला असलेल्या गोठ्यालाही आग लागल्याने मध्यरात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे बैल, शेती साहित्य लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

आग वाढल्यानंतर गावातील काही लोकांनी पाहिली. मात्र आग एवढी मोठी होती की आग आटोक्या आणण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. तरीही आग काही आटोक्यात आली नाही. यात मोठे तीन  बैल जळून जागीच खाक झाले आहेत. गोठ्यातील स्प्रिंक्लर पाईप इतर शेती उपयोगी साहित्य हे जळून गेले आहे. मैनोद्दीन तांबोळी यांची येथे आठ एकर जमीन असून तीन मुले आहेत. सध्या शेती मुले करीत असून एकत्रित परिवार आहे. या ठिकाणी गुऱ्हाळाचे साहित्य मोटारी, तुषार पाईप, मोटारी असे मोठे नुकसान झाले असून आग आपल्याच गोठ्याला लागली असून यात बैल व पारडू आगीत जळून गेले आहे. ही माहिती वृद्ध मैनोद्दीन तांबोळी यांना समजली. त्यांनी प्रत्यक्ष पाहिली असता त्यांना रडू अनावर झाले.

गेल्या आठ वर्षांपासून सांभाळ करणाऱ्या मुक्या जनावरांना असा मृत्यू आल्याने त्यांना दु:ख अनावर झाले होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे  शिवारात पाण्याचे प्रमाण कमी आहे. शर्तीचे प्रयत्न करूनही आग विझवता न आल्याने सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानीची पाहणी करून मंडळधिकारी व तलाठी यानी पंचनामा केला असून अहवाल शासनाकडे पाठवला आहे. आग कशामुळे लागली का कोणी लावली  नेमकं कारण समजले नाही.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात 12 हजार झाडांची कत्तल सुरू; पर्यावरणप्रेमी गप्पच, 8 हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम!

IND vs NZ ODI Series: ऋतुराज गायकवाड IN; हार्दिक, जसप्रीत बुमराह OUT! भारताचा किवींविरुद्ध वन डे मालिकेसाठीचा संभाव्य संघ

'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेतील अभिनेत्री लवकरच लग्न करणार, होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमॅन्टिक व्हिडिओ शेअर

CBSE KVS and NVS Recruitment 2025: सीबीएसईने केव्हीएस आणि एनव्हीएस भरती २०२५ टियर-१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'असे' करा सिटी स्लिप आणि अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये भररस्त्यावर तरुणांची गुंडागर्दी; दगडफेक व काठ्यांनी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT