Latur News: ‘मांजरा’त ३.५ टक्के उपयुक्त साठा, संगमेश्वर प्रकल्प शंभर टक्के भरला  sakal
मराठवाडा

Latur News: ‘मांजरा’त ३.५ टक्के उपयुक्त साठा, संगमेश्वर प्रकल्प शंभर टक्के भरला

Latest Marathi News: या धरणातील मृतसाठ्याच्या वर पाणी आलेले नव्हते. पण गेल्या काही दिवसात मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. याचा

सकाळ वृत्तसेवा

Marathwada: गेल्या काही महिन्यापासून मृतसाठ्यात असलेले मांजरा धरणात आता हळूहळू पाणी येऊ लागले आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात पाण्याचा येवा सुरु झाला आहे. या धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा आता साडे तीन टक्क्यावर गेला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

लातूर शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाला. याचा परिणाम धरणात पाणीसाठा झाला नाही. गेल्या काही महिन्यापासून धरणातील मृतसाठ्यातूनच शहराला तसेच इतर पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा केला जात आहे.

या वर्षी देखील पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षा पेक्षा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे या धरणातील मृतसाठ्याच्या वर पाणी आलेले नव्हते. पण गेल्या काही दिवसात मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे.

मांजरा’त साडेतीन टक्के साठा

याचा परिणाम धरणाच्या वरच्या बाजूला असलेला संगमेश्वर मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पाणी मांजरा नदीच्या पात्रात येत आहे. मांजरा नदी भरून वाहू लागली आहे. नदीचे हे पाणी पुढे मांजरा धरणात येत आहे . त्यामुळे या धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६.२२ दशलक्ष घनमीटर झाला.

याची टक्केवारी ३.५२ इतकी झाली आहे. सध्या या धरणात ५३.३५२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यात मृतसाठा हा ४७.१३० दशलक्ष घनमीटर इतका आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. तिसऱ्या महिन्याचे दहा दिवस देखील आता संपले आहेत. या धरणात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT