NATIONAL HIGHWAY 
मराठवाडा

'औसा - नांदेड ते वारंगाफाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु'

प्रशांत शेटे

चाकुर (लातूर): औसा - लातूर - चाकूर - अहमदपुर - नांदेड ते वारंगाफाटा या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होते. आता ते काम २९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डेही तातडीने बुजविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुनिल पाटील यांनी दिली आहे. चापोली (ता.चाकूर) जवळ राष्ट्रीय महामार्गाची बुधवारी (ता.२०) त्यांनी पाहणी केली.

रत्नागिरी ते नागपूर रस्त्यावरील आैसा ते वारंगाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे स्थलांतरीत झाला असून यास ३६१ क्रमांक देण्यात आला आहे. रस्ताच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आली असून यातील काही शेतकऱ्यांना मावेजा देण्यात आलेला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपुर्वी सुरु झाले होते. परंतू काही दिवसानंतर हे काम बंद करण्यात आले होते. या रस्त्यावर मोठे - मोठे खड्डे पडले असून ते बुजविण्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. तसेच रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रकल्प संचालक श्री. पाटील यांनी सदरील रस्त्याची पाहणी केली पुर्वीच्या कंत्राटदाराकडील काम रद्द करण्यात आले असून नवीन कंत्राटदाराकडून २९ जानेवारी पासून रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु केले जाणार आहे.

१८८ किलोमिटरच्या या रस्त्यावर लातूर ते चाकूर, अहमदपुर ते लोहा, नांदेड ते वारंगाफाटा दरम्यान तीन टोलनाके राहणार आहेत. रस्त्याच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून काम केलं जाणार असून ५० वर्षे तरी रस्त्याला काही होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.

लातूररोड येथील रेल्वे पुल, मांजरा नदीवरील पुलासह इतर ठिकाणच्या पुलाचे कामही तातडीने सुरु होणार असून दोन वर्षाच्या आत रस्त्याचे काम पुर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्गाचे प्रयत्न असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. लातूर ते चाकूर दरम्यानचे खड्डे बुजविण्यात आले आहेत लोहा ते चापोली पर्यंतचे काम ही चार दिवसात पुर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT