Pratiksha Koli  
मराठवाडा

स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच

जलील पठाण.

औसा (जि.लातूर) : दोन एकर शेतीत राबणारे आई बाबा आण् दोन लहाण शाळकरी भावंडांसह तिला शिकवितांना पालकांना येणाऱ्या अडचणी शिकुन सवरुन दुर करण्याचे स्वप्न पापण्यात लपवून महाविद्यालयात शिक्षण घेनाऱ्या तरुणीचे स्वप्न पूर्ण होण्याचा आगोदरच तिला काळाने गाठले. शेतात राबणाऱ्या हाताला आराम देण्याचे आणि लहान भावांना चांगले शिक्षण देऊन त्यांनाही मोठा आधिकारी बणविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. औसा तालुक्यातील वडजी गावातील महाविद्यालयीन तरुणी प्रतिक्षा गोवर्धन कोळी (वय 19) हिचा शनिवारी (ता.20) कपडे वाळविण्यासाठी बांधलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने अपघाती मृत्यु झाला आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या तरुणीला काळाने अडविले.


वडजी येथील गोवर्धन कोळी यांना तीन आपत्ये आहेत त्यातली थोरली प्रतिक्षा ही महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होती. घरातील गरीबी आणि आई वडीलांचे कष्ट ती लहानपणापासुनच पाहत होती. वाट्याला दोनच एकर शेत आणि तीन मुले शिक्षण घेणारी यामुळे आई बाबांच्या काष्टांना कुठेतरी शिकुण नोकरीला लागून न्याय द्यावा, त्यांच्या राबलेल्या हाताला आराम द्यावा त्याच प्रमाणे गरीबीमुळे लहान भावंडांना चांगले शिक्षण मिळत नसल्याने त्यांनाही चांगले शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न उराशी बाळगत कधी आई बाबांना शेतात मदत तर कधी आईला घरकामासह लहाण भावांचा सांभाळ व अभ्यास घेणारी प्रतिक्षा कसुन अभ्यास करायची. तिला माहीती होते की, दोन एकर शेतात कितीही राबले तरी पाच जणांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होणे शक्य नव्हते म्हणुन स्वतः उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची अन् लहान भावंडांनाही चांगले शिक्षण देत त्यांनाही नोकरीवर लावण्याचा मानस ती नेहमीच बोलुन दाखवायची.

घरात मोठी असल्याने शिक्षणा बरोबरच तीने मोठे स्वप्नंही पाहिली होती आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी रात्रंदिवस झटतही होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते, प्रतिक्षांने आपल्या पापण्यात साठविलेल्या स्वप्नांना पापण्यातच विरुन टाकायचे हेच नियतीच्या मनात होते. शनिवारी धुतलेले कपडे घरात लोखंडी तारेवर सुकायला टाकतांना त्या तारेत विद्युत प्रवाह उतरला आणि कपडे ओले असल्याने प्रतिक्षाला विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यात ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत ती हे जग आणि आपल्या आई बाबांना आणि लहान दोन भावंडांना सोडून गेली होती. तिने पाहिलेली सर्व स्वप्नें आपल्याच पापण्यात घेऊन तिने या जगाचा निरोप घेतला. या हुशार आणि होतकरुन मुलीच्या निधनांने वडजी गावावर शोककळा पसरली असुन तिने शेजारी पाजारी बोलुन दाखविलेल्या गोष्टी आज लोक बाहेर काढुन डोळे ओले करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT