Latur Rain News Sakal
मराठवाडा

Latur Rain News : पानचिंचोली मंडळाला अवकाळी पावसाने झोडपले; पिकांचे नुकसान

एकाच तासात ७४ मिलीमीटर पाऊस च ज्वारी, तूर, ऊस पडला आडवा

राम काळगे

निलंगा: तालुक्यातील पानचिंचोली व निटूर महसूल मंडळात मंगळवारी ता. २८ रोजी जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. शिवाय वादळी वारे व पावसामुळे ऊस, रब्बी ज्वार, तूर ही पीके आडवी झाली असून सर्वाधिक फटका पानचिंचोली व निटूर महसूल मंडळात बसला आहे. पानचिंचोली मंडळात एका तासात ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाऊस पडणार म्हणून गेल्या कांही दिवसापासून हवामान विभाग अंदाज वर्तवत होते. दिवसभर उन्हाची तिव्रता व सायंकाळी ढगाळ वातावरण असल्याने रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला तालुक्यातील निटूर, हाडगा, उमरगा, मसलगा , तुपडी, गौर, कलांडी यासह आदी भागात हा अवकाळी पाऊस झाला आहे.

तर मदनसुरी,कासार शिरसी, कासार बालकुंदा, हलगरा, औरादशहाजनी, भुतमुगळी,निलंगा या मंडळात रिमझिम पाऊस झाला आहे. या पावसामुळे हरभरा, गहू, करडई, ज्वारी या रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे.

तालुक्यातील पानचिंचोली या मंडळात सर्वाधिक ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.तर त्यापाठोपाठ निटूर मंडळात २० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र तालुक्यातील इतर मंडळात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे.

त्यात मदनसुरी-०५,कासार शिरसी ०८ ,कासार बालकुंदा०७,हलगरा-०७ शहाजनी-०४,भुतमुगळी-०३,निलंगा -०६,अंबुलगा १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे या मंडळातील रब्बी पिकासाठी चांगल्या पावसाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

रोहित शर्माकडून ODI कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर Shubman Gill ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, '२०२७ वर्ल्ड कपमध्ये...'

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT