Srushti jagtap Make Asia Book Of Records 
मराठवाडा

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

विकास गाढवे

लातूर : नववीत शिक्षण घेत असलेल्या सृष्टी जगताप या विद्यार्थिनीने सलग चोवीस तास लावणी सादर करण्याचा विश्वविक्रम केला. नॉनस्टॉप लावणी सादर करून तीने रचलेल्या या इतिहासाची आशिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. प्रजासत्ताक दिनी मंगळवारी (ता. २६) सायंकाळी साडेचार वाजता सुरू केलेल्या या लावणीनृत्याचा शेवट चोवीस तासानंतर बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेचार वाजता झाला. 

सृष्टीने सलग चोवीस तास लावणी सादर करून आशिया रेकॉर्ड मध्ये नवा विक्रम स्थापित करणार असल्याचे जाहिर केले होते. बालवयापासूनच तिला नृत्याची आवड आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तीने दूरचित्रवाणीवरील नृत्य स्पर्धात भाग घेण्यास सुरवात केली. विश्वविक्रमाच्या निमित्ताने आशिया खंडात प्रथमच मराठमोळी लावणीचा आशिया रेकॉर्ड हा नवा विक्रम झाला आहे. देशातच नव्हे तर आशिया खंडात प्रथमच लातुरामध्ये घडणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी येथील दयानंद सभागृहात नागरिक व प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

यापूर्वी तीने सलग बारा तासापेक्षा अधिक काळ नृत्य सादर केले. स्वतःचाच हा विक्रम मोडून आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी तीने ही अथक लावणी सादर केली. तीला एका तासाला तीन मिनिटे विश्रांती घेण्याची परवानगी होती. डॉक्टरांचे एक पथक तीची प्रत्येक दोन तासाला तपासणी करत होते. सायंकाळी साडेचार वाजता चोवीस तास संपताच सभागृहात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षकांनी तिला विश्वविक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार केला.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT